50 तासांच्या बॅटरी लाइफसह Mivi Earbuds लाँच, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

50 तासांच्या बॅटरी लाइफसह Mivi Earbuds लाँच, 1000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी
HIGHLIGHTS

Mivi DuoPods F40 इयरबड्स भारतात लाँच

लाँच डे ऑफरअंतर्गत किंमत फक्त 999 रुपये

तब्बल 50 तासांपर्यंत बॅटरी लाईफ असण्याच्या दावा

तब्बल 50 तासांपर्यंत बॅटरी लाइफ असलेले Mivi DuoPods F40 इयरबड्स भारतात लाँच करण्यात आले आहेत. इयरबड्स फ्लिपकार्ट आणि Mivi वेबसाइटवर पाच कलर ऑप्शन्ससह 'लाँच डे' ऑफर प्राईसमध्ये उपलब्ध आहेत. DuoPods F40 IPX4 वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतात. इयरबड्सच्या बॅटरी केसमध्ये LED स्क्रीन आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना बॅटरी किती वापरली गेली याबाबत कळेल. चला तर जाणून घेऊयात Mivi DuoPods F40 सविस्तरपणे तपशील… 

Mivi DuoPods F40ची किंमत आणि उपलब्धता

Mivi चे नवीन DuoPods F40 भारतात लाँच डे ऑफर अंतर्गत 999 रुपयांच्या किमतीत लाँच केले गेले आहेत. प्रास्ताविक ऑफरनंतर, तुम्हाला हवे असल्यास इयरबड्स 1,199 रुपयांना उपलब्ध होतील. हे डिवाइस तुम्हाला Flipkart आणि Mivi च्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येईल. Mivi DuoPods F40 व्हाईट, ब्लॅक, ग्रे, ग्रीन आणि ब्लु अशा पाच वेगवेगळ्या कलर ऑप्शन्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. येथून खरेदी करा… 

हे सुद्धा वाचा : 50MP कॅमेरा, 6GB RAM आणि 5000mAh बॅटरीसह सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन्स, किंमत रु. 15,000पेक्षा कमी

Mivi DuoPods F40 स्पेसिफिकेशन्स 

Mivi DuoPods F40 मध्ये स्टुडिओ साउंड एक्सपेरियन्ससाठी 13mm इलेक्ट्रो-डायनॅमिक ड्रायव्हर्स आहेत. DuoPods F40 इयरबड्स वजनाने हलके आहेत. तसेच, यात परिधान करणार्‍यांच्या आरामासाठी एर्गोनॉमिक डिझाइन आहे. यात चांगल्या कॉल कॉलिटीसाठी ड्युअल मायक्रोफोनचा वापर होतो. तसेच, यात सिरी आणि गुगल असिस्टंटसाठी सपोर्टदेखील मिळेल. या इअरबड्सना ऑडिओ ट्रॅक बदलण्यासाठी, कॉल स्वीकारण्यासाठी आणि कॉल नाकारण्यासाठी वन-टॅप टच बटन्स देखील मिळतात.

DuoPods F40 सिंगल चार्जवर तब्बल 50 तास चालतात, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. यात वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ आवृत्ती 5.1 आहे. केसमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट आणि बॅटरी युसेज ट्रॅक करण्यासाठी LED डिस्प्ले आहे. इयरबड्स IPX4 वॉटर रेझिस्टंट रेटिंगसह येतात, जेणेकरुन वापरकर्त्यांना ते पाऊस आणि वर्कआउट सेशनमध्ये घालता येतील. यासोबतच, यामध्ये एक वर्षाची मॅन्युफॅक्चरिंग वॉरंटीही दिली जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo