भारतात लॉजिटेक UE बूम 2 ब्लूटुथ स्पीकरने मागील जून महिन्यात लाँच केल्या गेलेल्या अल्टीमेट इयर्स बूम स्पीकरची जागा घेतली आहे, ह्याची किंमत १४,९९५ रुपये आहे.
लॉजिटेकने भारतात एक नवीन ब्लूटुथ स्पीकर UE बूम लाँच केला. कंपनीने भारतामध्ये आपल्या ह्या डिवाइसची किंमत १५,९९५ रुपये ठेवली आहे. भारतामध्ये लॉजिटेक UE बूम 2 ब्लूटुथ स्पीकरने मागील जून महिन्यात लाँच केल्या गेलेल्या अल्टीमेट इयर्स बूम स्पीकरची जागा घेतली आहे, ह्याची किंमत १४,९९५ रुपये आहे. कंपनीने ह्या डिवाइसला मागील वर्षी सप्टेंबरमध्ये अमेरिकेमध्ये लाँच केले होते.
लॉजिटेक UE बूम 2 ब्लूटुथ स्पीकरची 100 फूटापर्यंत वायरलेस रेंज आहे आणि कंपनीचा दावा आहे की, ही कंपनी आपल्या जनरेशनपेक्षा 25% पेक्षा जास्त साउंड क्वालिटी देते. ह्या नवीन डिवाइसमध्ये नवीन रंगात लाँच केले आहे. हा रेड आणि पिंक, ब्लॅक आणि ग्रे, ग्रीन आणि ब्लूस पर्पल आणि ऑरेंज आणि डार्क आणि मिडियम ब्लू या रंगांच्या कॉम्बिनेशनमध्ये उपलब्ध आहे.
हा स्पीकर वेगेवेगळ्या हवामानातसुद्धा उत्कृष्टरित्या काम करतो आणि अगदी कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी करतो. हा वॉटर रजिस्टंस आहे. ह्यात 5 फूट खोल पाण्यातसुद्धा वापरता येऊ शकतो. हा पुर्ण चार्ज झाल्यावर १५ तासांपर्यंत चालतो. ह्यात टॅप बटन्ससुद्धा दिले गेले आहेत.