LeEco Leme ब्लूटूथ हेडफोन भारतात लाँच

LeEco Leme ब्लूटूथ हेडफोन भारतात लाँच
HIGHLIGHTS

त्याचबरोबर कंपनीने भारतात ऑल मेटल इयरफोन्स आणि रिव्हर्स इन-इयर हेडफोन्स भारतात लाँच केले आहेत.

LeEco ने भारतात आपला नवीन ब्लूटुथ हेडफोन Leme लाँच केला आहे. त्याचबरोबर कंपनीने भारतात मेटल ईयरफोन्स आणि रिव्हर्स इन-इयर हेडफोन्ससुद्धा लाँच केले आहेत. हे सारे डिवायसेस कंपनीने स्वत: च्या ऑनलाइन स्टोर Lemall वर उपलब्ध केले आहेत.

कंपनीने भारतात Leme ब्लूटुथ हेडफोनची किंमत २,४९९ रुपये ठेवली आहे आणि हा लाल, नारिंगी, गुलाबी आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे. कंपनीने सांगितले आहे की, Leme ब्लूटुथ हेडफोन 40mm मूव्हिंग कोंइल ड्रायव्हर्ससह येतो. हा स्ट्राँग बास देतो. हा ब्लूटुथ 4.1 कनेक्टिव्हिटीसह येतो. ह्यात 195mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीनुसार, हा १० तासांची म्यूजिक प्लेबॅक देतो. ह्या हेडफोनला दोन तासांमध्ये चार्ज करु शकतो. ह्यात एक बिल्ट-इन मायक्रोफोन दिला गेला आहे आणि ह्याचे वजन 240 ग्रॅम आहे.

तर ऑल मेट इयरफोन्सची किंमत १,४९९ रुपये आहे आणि हा गनमेटल काळ्या रंगात उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, ह्या डिवाइसला इंडस्ट्रियल-ग्रँड स्टीलने बनवले आहे. ह्याचे वजन १५ ग्रॅम आहे.

हेदेखील पाहा – पेबल टाईम स्मार्टवॉच अनबॉक्सिंग

रिव्हर्स इन-इयर हेडफोन्सविषयी बोलायचे झाले तर, ह्याची किंमत ८९९ रुपये आहे. हा गुलाबी, काळा , निळा आणि पांढ-या रंगात उपलब्ध आहे.

हेदेखील वाचा – हॅक झाली नाही IRCTC ची वेबसाइट, IRCTC ने केले खंडन
हेदेखील वाचा – 
इंटेक्सच्या ह्या नवीन स्मार्टफोनची किंमत आहे केवळ २,७९९ रुपये

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo