LeEco ने लाँच केले USB Type-C ईयरफोन्स आणि हेडफोन्स

LeEco ने लाँच केले USB Type-C ईयरफोन्स आणि हेडफोन्स
HIGHLIGHTS

LeEco ने अलीकडेच आपले अनेक नवीन प्रोडक्ट लाँच केले. त्यांच्या ड्रायवरलेस कारने तर सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित केले आहे.मात्र तरीही ह्याच्या लाँचेसचा सपाटा चालूच राहीला आता कंपनीने आपले नवीन USB Type-C ईयरफोन्स आणि हेडफोन्स लाँच केले आहे.

LeEco ने अलीकडेच आपले अनेक नवीन प्रोडक्ट लाँच केले. त्यांच्या ड्रायवरलेस कारने तर सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित केले आहे.मात्र तरीही ह्याच्या लाँचेसचा सपाटा चालूच राहीला आता कंपनीने आपले नवीन USB Type-C ईयरफोन्स आणि हेडफोन्स लाँच केले आहे. ह्याआधी कंपनीने आपले तीन नवीन स्मार्टफोन्स लाँच केले होते, ज्यात 3.5mm जॅक नव्हता.
 

LeEco च्या DCLA ईयरफोन्स आता केवळ चीनमध्ये कंपनीच्या वेबसाइटच्या माध्यमातून उपलब्ध आहे. मात्र त्याशिवाय आतापर्यंत CDLA नॉईज-कन्सेलिंग हेडफोन्सची किंमत आणि उपलब्धततेविषयी कोणतीही माहिती मिळालेली नाही.

CDLA इयरफोन्समध्ये USB Type-C कनेक्टरशिवाय डिजिटल,डिकोडिंग चिपसुद्धा आहे, ज्याच्या माध्यमातून ऑडियो क्वालिटी 24 बिट/96kHz होते. त्याचबरोबर ह्याची डिझाईन खूपच उत्कृष्ट आहे. ह्याच्या किंमतीविषयी बोलायचे झाले तर, हा CNY 149 म्हणजेच जवळपास १५२० रुपयांच्या जवळपास आहे.

CDLA नॉईज-कन्सेलिंग हेडफोन्सविषयी बोलायचे झाले तर, कंपनी सांगते की, ह्या हेडफोनमध्ये एक्टिव नॉईज फीचर आहे, जो एअरोप्लेन मोडवर सुद्धा सक्रिय राहतो. आणि अंतर्गत बॅटरीशिवाय काम करतो. त्याशिवाय ह्यात 24 बिट/96kHz ची डिजिटल डिकोडिंगसुद्धा आहे.
 

हेदेखील वाचा – 2.5D कर्व्ह्ड डिस्प्लेसह येतात भारतातील हे आकर्षक स्मार्टफोन्स

 

कंपनीने आपल्या ह्या ड्रायवरलेस कॉन्सेप्ट कारवरुन पडदा उठवला आहे. LeEco च्या ह्या कारविषयी कंपनीचा दावा आहे की, ही जगातील पहिली ड्रायवरलेस कॉन्सेप्ट सुपरकार आहे. ह्या कारच्या डिझाईनविषयी बोलायचे झाले तर, ह्यात एक मोठी LED स्क्रीन दिली आहे. ह्या कारमध्ये फेसिअल रेकॉग्निशन, इमोशन रेकॉग्निशन, सिस्टम रेकॉग्निशन आणि पाथ रेकॉग्निशन तंत्रज्ञान आहे.

हेदेखील वाचा – LeECo सादर केली ड्रायवरलेस इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार

 

ह्या कार्यक्रमात कंपनीने आपल्या 4th जेनचे तीन सुपर टिव्हीसुद्धा लाँच केले. सुपर 4 X50 प्रो, सुपर 4X50, सुपर 4X50 CSL. ह्या टिव्हीचा आकार ५० इंच आहे आणि हा 9.9mm अल्ट्रा-स्लिम मेटल बॉडीसह येतो.

हेदेखील वाचा – LeEco Le 2, Le 2 प्रो, Le मॅक्स 2 स्मार्टफोन लॉन्च
हेदेखील वाचा – आता ‘पिंक गोल्ड’ रंगातही मिळणार गॅलेक्सी S7, S7 एज स्मार्टफोन

Poonam Rane Poyrekar

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo