भारीच की! OnePlus Nord Buds 3 लाँच, केवळ 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Updated on 17-Sep-2024
HIGHLIGHTS

नवीनतम इयरबड्स OnePlus Nord Buds 3 भारतीय बाजारात लाँच

नवीनतम OnePlus Nord Buds 3 ची किंमत 2,299 रुपये इतकी आहे.

विशेष म्हणजे OnePlus Nord Buds 3 मध्ये ड्युअल कनेक्शनची सुविधा देखील देण्यात आली आहे.

लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता OnePlus चे इतर प्रोडक्ट्स देखील भारतीय ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. OnePlus चे नवीनतम इयरबड्स OnePlus Nord Buds 3 भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहेत. हे इयरबड्स 43 तासांच्या बॅटरी लाइफसह आणि ANC सपोर्टसह उत्तम आवाज गुणवत्तेसह येतात, असा कंपनीचा दावा आहे. हे बड्स परवडणाऱ्या किमतीत लाँच करण्यात आले आहेत. पाहुयात किंमत आणि ऑफर्स-

Also Read: लाँचपूर्वीच आगामी Vivo V40e ची किंमत लीक! 50MP सेल्फी कॅमेरा मिळतील अनेक Powerful फीचर्स

OnePlus Nord Buds 3 ची किंमत आणि ऑफर्स

नवीनतम OnePlus Nord Buds 3 ची किंमत 2,299 रुपये इतकी आहे. मात्र, विशेष ऑफर अंतर्गत सुरुवातीला हे बड्स 2000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळतील. म्हणजेच तुम्ही हे बड्स 1,899 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकतात. हे बड्स हार्मोनिक ग्रे आणि मेलोडिक व्हाईट कलर ऑप्शन्ससह खरेदी केले जाऊ शकतात.

उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन OnePlus इयरबड्स Amazon, Flipkart वरून खरेदी केले जाऊ शकतात. या बड्सची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक आणि OneCard क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट व्यवहार केल्यास ग्राहकांना 200 रुपयांची झटपट बँक सवलत मिळणार आहे.

OnePlus Nord Buds 3 चे तपशील

नवीन OnePlus इअरबड्समध्ये 12.4mm डायाफ्राम आणि 2.0 बासवेव्ह सपोर्ट आहे. OnePlus Nord Buds 3 मध्ये 32dB पर्यंत ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन ANC फीचर्स आहेत. या बड्समध्ये ट्रान्सपरंट आणि नॉइज रिडक्शन असे दोन मोड्स देण्यात आले आहेत. या फीचर्सद्वारे तुम्हाला सभोवतालचा अनावश्यक आवाज ऐकू येणार नाही. याशिवाय, AI क्लियर कॉल फीचर देखील उपलब्ध आहे, जे ऍडव्हान्स ड्युअल माइक सिस्टमसह येते.

विशेष म्हणजे OnePlus Nord Buds 3 मध्ये ड्युअल कनेक्शनची सुविधा देखील देण्यात आली आहे. अर्थात तुम्ही एकाच वेळी दोन उपकरणांसह इअरबड कनेक्ट करू शकता. धूळ आणि घामापासून संरक्षण करण्यासाठी हे IP55 रेटिंगसह येतील. इयरबड्स एका पूर्ण चार्जवर हे बड्स 12 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक आणि चार्जिंग केससह एकूण 43 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. जलद चार्जिंग मोडमध्ये, ते फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगसह 11 तासांचा प्लेबॅक टाइम देऊ शकतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :