Oneplus 13 सिरीजसह लेटेस्ट OnePlus Buds Pro 3 देखील भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि विशेषता 

Oneplus 13 सिरीजसह लेटेस्ट OnePlus Buds Pro 3 देखील भारतात लाँच! जाणून घ्या किंमत आणि विशेषता 
HIGHLIGHTS

OnePlus ची नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज OnePlus 13 अखेर भारतात लाँच

या स्मार्टफोन सिरीजसह OnePlus Buds Pro 3 देखील भारतात लाँच

OnePlus Buds Pro 3 आता Sapphire Blue मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

प्रसिद्ध फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखली जाणारी OnePlus ची नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सिरीज OnePlus 13 अखेर भारतात लाँच झाली आहे. नव्या सिरीजमध्ये OnePlus 13 आणि OnePlus 13R स्मार्टफोनचा समाविष्ट आहेत. Apple Intelligence शी स्पर्धा करण्यासाठी OnePlus च्या नवीन फोनमध्ये शक्तिशाली आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) फीचर्स देखील असतील. एवढेच नाही तर, या स्मार्टफोन सिरीजसह OnePlus Buds Pro 3 देखील लाँच करण्यात आला आहे. यासह तुम्हाला अनेक विशेषता मिळतील. जाणून घेऊयात OnePlus Buds Pro 3 ची किंमत-

Also Read: Finally! बहुप्रतीक्षित OnePlus 13 सिरीज भारतात अखेर लाँच, नवे स्मार्टफोन AI फीचर्ससह सुसज्ज, पहा किंमत

OnePlus Buds Pro 3 ची भारतीय किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, OnePlus Buds Pro 3 देखील OnePlus 13 सिरीजसोबत लाँच करण्यात आला आहे. OnePlus Buds Pro 3 ची किंमत 11,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे बड्स 10 जानेवारी 2025 पासून दुपारी 12 वाजता विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जातील. लक्षात घ्या की, 26 जानेवारी 2025 पर्यंत ग्राहकांना 1,000 रुपयांची सूट मिळेल.

OnePlus-Nord-Buds-3-Pro

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, ICICI बँक कार्ड धारकांना 1000 रुपयांचे अतिरिक्त इन्स्टंट बँक डिस्काउंट मिळेल. तर, ग्राहक 6 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI देखील निवडू शकतात. हे बड्स 10 जानेवारी 2025 पासून कंपनीची अधिकृत साईट, Amazon.in, Flipkart, Myntra आणि OnePlus Experience Stores द्वारे ऑफलाइन देखील खरेदी केले जाऊ शकते.

OnePlus Buds Pro 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Buds Pro 3 आता Sapphire Blue मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रत्येक इअरबडमध्ये ड्युअल ड्रायव्हर्स आणि DAC आहेत, जे पॉवरफुल साउंड प्रदान करतात. या बड्समध्ये 50dB पर्यंत ॲडॉप्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन फीचर आहे. विशेष म्हणजे OnePlus 13 सिरीजसोबत हे बड्स वापरल्यास, नवीन AI ट्रान्सलेशन फिचर वापरकर्त्यांना रिअल-टाइम संभाषणे भाषांतरित करण्यास अनुमती देतो.

बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, 10-मिनिटांच्या चार्जनंतर हे बड्स 5+ तास प्लेबॅक देतात. त्याबरोबरच, चार्जिंग केससह तुम्हाला 43 तासांपर्यंत बॅटरी लाइफ मिळेल. एवढेच नाही तर, OnePlus Buds Pro 3 केससह 566 mAh बॅटरी देते. इतर फीचर्समध्ये Google लोकल ऑडिओ, टच कंट्रोल आणि IP55 पाणी प्रतिरोध यांचा समावेश आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo