Nothing Ear (open) Launched: आकर्षक डिझाईनसह नवे इयरबड्स भारतात दाखल, भारी स्मार्टफोनच्या किमतीत बड्स लाँच

Updated on 25-Sep-2024
HIGHLIGHTS

नवे आकर्षक इयरबड्स Nothing Ear (open) भारतात लाँच

Nothing चे पहिले ओपन वेअरेबल स्टिरिओ (OWS) इयरबड्स आहेत.

Nothing Ear (open) ची विक्री 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

प्रसिद्ध टेक कंपनी Nothing ने आपले नवे आकर्षक इयरबड्स Nothing Ear (open) भारतात लाँच करण्यात आले आहेत. हे कंपनीचे पहिले ओपन वेअरेबल स्टिरिओ (OWS) इयरबड्स आहेत, ज्यांचे डिझाइन अगदी वेगळे आहे. नावाप्रमाणेच हे इअरबड्स ओपन-इअर डिझाइनसह येतात. या प्रकारच्या बड्स तुमच्या कानात पूर्णपणे जात नाहीत, त्या कानाला वरच्या बाजूस आधार म्हणून कॅरी केले जातात.

या बड्समुळे तुम्हाला म्युझिकसोबतच तुमच्या आजूबाजूचे आवाजही ऐकू येतील. या प्रकारच्या डिझाइनसह बड्स घालण्यास अतिशय आरामदायक असतात. शिवाय, बड्सचे फिटिंग देखील परिपूर्ण आहे. नथिंगचे प्रोडक्ट असल्याने हे बड्स अनोख्या ट्रान्सपरंट डिझाइनसह येतात. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Nothing Ear (open) ची किंमत आणि सर्व तपशील-

Also Read: नवा CMF Phone 1 फक्त 12,999 रुपयांमध्ये Flipkart वर उपलब्ध, खरेदी करणे योग्य ठरेल का?

Nothing Ear (open) ची भारतीय किंमत

Nothing कंपनीने आपले नवे Nothing Ear (open) बड्स 17,999 रुपयांना लाँच केले आहेत. कंपनीच्या इतर ऑडिओ उपकरणांच्या तुलनेत हे एक्सपेन्सिव्ह आहेत. या बड्सचे प्री-बुकिंग आजपासून सुरू होणार आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या बड्सची विक्री 1 ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Nothing Ear (open) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Nothing Ear (open) मध्ये 14.2 मिमी डायनॅमिक ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत. यात 3 माइक देखील देण्यात आले आहेत. हे बड्स कॉल दरम्यान स्पष्ट साउंड कॉलिटीसाठी क्लिअर व्हॉईस तंत्रज्ञानासह नॉइज कॅन्सलेशनसह येतात. पाण्याच्या संरक्षणासाठी या बड्सला IP55 रेटिंग देण्यात आली आहे. या बड्समध्ये 64mAh बॅटरी आहे. तर, तुम्हाला केससह 635mAh चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे.

या बड्समध्ये ChatGPT इंटिग्रेट करण्यात आले आहे. यात अनेक टच कंट्रोल्स देखील आहेत. ज्यामध्ये प्ले/पॉज, स्किप फॉरवर्ड, स्किप बॅक, आंसर कॉल्स, रिजेक्ट कॉल इ. मिळतील. कनेक्टिव्हिटीसाठी, हे बड्स ब्लूटूथ 5.3, AAC, SBC कोडला सपोर्ट करतात. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील बडमध्ये उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :