JBL ने एकाच वेळी तीन नवीन प्रीमियम स्पीकर सादर केले आहेत. कंपनीने JBL PartyBox 710, PartyBox 110 आणि PartyBox Encore Essential भारतात सादर केले आहेत. तिन्ही स्पीकर्सना वॉटर आणि स्प्लॅश रेसिस्टंटसाठी IPX4 रेट केले गेले आहे. यासोबतच या ब्लूटूथ स्पीकरमध्ये लाइट-शो इफेक्टही देण्यात आला आहे. चला जाणून घेऊयात या स्पीकर्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स…
हे सुद्धा वाचा : AMAZON असो किंवा FLIPKART, 'अशा'प्रकारे शॉपिंग करा आणि बंपर डिस्काउंट मिळवा
हे स्पीकर पोर्टेबल डिझाइन आणि स्केअर साईजच्या बॉक्स फॉर्म फॅक्टरसह सादर केले आहे. या पार्टी स्पीकरमध्ये 800W साउंड आउटपुट मिळेल, जे ड्युअल 2.75-इंच ट्वीटर आणि 8-इंच सब-वूफरने सुसज्ज आहे. यात स्टिरिओ साउंडसाठी सपोर्ट आहे. स्पीकरला ब्लूटूथ v5.1 कनेक्टिव्हिटीसह माइक आणि गिटार कनेक्ट करण्याचा पर्याय देखील मिळतो. याला डस्ट आणि स्प्लॅश रेसिस्टंटसाठी IPX4 रेटिंग देखील मिळते.
हा स्पीकरदेखील पोर्टेबल डिझाइनसह येतो. यामध्ये 160W साउंड आउटपुट मिळेल, जे जेबीएलच्या ओरिजिनल प्रो साउंड टेक्नॉलॉजीसह येते. या स्पीकरमध्ये स्टिरीओ साउंडचाही सपोर्ट देण्यात आला आहे. या स्पीकरमध्ये ब्लूटूथ v5.1 ची कनेक्टिव्हिटी आणि माइक, गिटार कनेक्ट करण्याचा पर्याय देखील आहे. या स्पीकरमध्ये डायनॅमिक फन रिंग लाइट-शो आणि कूल स्ट्रोब इफेक्ट मिळतो.
या स्पीकरमध्ये 100W आउटपुट मिळेल. तसेच, यात JBL चे ओरिजिनल प्रो साउंड टेक्नॉलॉजी आहे. या स्पीकरमध्ये 6 तासांचा बॅटरी बॅकअप देण्यात आला आहे. या स्पीकरमध्ये तुम्हाला IPX4 रेटिंग देखील मिळते. पार्टीबॉक्स ऍपद्वारे तिन्ही स्पीकर एकाच वेळी नियंत्रित आणि कनेक्ट केले जाऊ शकतात.
भारतात JBL PartyBox 710 ची किंमत Rs.64,999 ठेवण्यात आली आहे. तसेच, पार्टीबॉक्स 110 ची किंमत 31,999 रुपये आणि एनकोर एसेंशियलची किंमत 25,499 रुपये ठेवण्यात आली आहे. हे स्पीकर कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्म तसेच ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवरून खरेदी केले जाऊ शकतात.