कंपनी या उपकरणासह दोन वर्षांची वॉरंटीदेखील देत आहे.
Jabra ने आपल्या ट्रू वायरलेस इयरबड्स पोर्टफोलिओमध्ये Jabra Elite 4 इयरबड्स नवे बड्स लाँच केले आहेत. हे नवे इयर बड्स Jabra Elite 3चे अपग्रेडेड वर्जन आहेत, असे कंपनीने सांगितले आहे. तरुणाईसाठी हे इयरबड्स बेस्ट ऑप्शन ठरतील, असे देखील कंपनीचे म्हणणे आहे. या लेखात आम्ही तुम्हाला नव्या इयरबड्सच्या किंमत आणि फीचर्सबद्दल सांगणार आहोत.
Jabra Elite 4 ची किंमत
Jabra Elite 4 ची किंमत तब्बल 9,999 रूपये इतकी आहे. म्हणजेच स्मार्टफोनच्या किमतीत तुम्हाला हे इयरबड्स मिळणार आहेत. हे बड्स खरेदी करण्यासाठी खिशाला जरा ताण बसणार आहे. Amazon, Flipkart आणि कंपनीच्या अधिकृत रीसेलर्सवर 14 एप्रिल पासून हे बड्स उपलब्ध असतील. हे बड्स चार क्लासिक कलरमध्ये खरेदी करता येतील.
फीचर्स :
Jabra Elite 4 मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिली गेली आहे. याद्वारे तुम्ही कॉल्स आणि ॲप्समध्ये सहज स्विच करू शकता. तसेच, ॲक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन सपोर्ट देखील तुम्हाला मिळणार आहे. कॉल किंवा म्युझिकसाठी गो सोलो फीचर दिला गेला आहे. हे उपकरण कंफर्टेबल फिटसह येईल.
हे उपकरण त्या युजर्ससाठी बेस्ट आहे, ज्यांना एकत्र दोन वेगवेगळ्या डीवाईसना कनेक्ट करायची गरज असते. यामध्ये 4 मायक्रोफोन कॉल टेक्नॉलॉजी आणि 6nm स्पीकर दिले गेले आहेत. बड्सची बॅटरी सिंगल कॉलवर 5.5 तास टिकते. त्याबरोबरच, केससह 22 तासांपर्यंत वापर करता येतो.
हे इयरबड्स प्रीमियम आणि मजबूत मटेरियलने बनवले गेले आहेत. धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी यांना IP55 रेटिंग मिळाली आहे. तसेच, कंपनी या उपकरणासह दोन वर्षांची वॉरंटीदेखील देत आहे.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.