इंटेक्स डिझायर BT ब्लूटुथ हेडफोन लाँच. किंमत १८०० रुपये

Updated on 20-Jun-2016
HIGHLIGHTS

हा हेडफोन खूपच सहजपणे अॅडजस्ट करता येतो. ह्यात LED इंडिकेशनसुद्धा आहेत.

इंटेक्सने बाजारात आपला नवीन ब्लूटुथ हेडफोन डिझायर BT लाँच केला आहे. कंपनीने आपल्या ह्या हेडफोनची किंमत १८०० रुपये ठेवली आहे. ह्या नवीन डिवाइससह बाजारात इंटेक्सनचे एकूण 10 हेडफोन्स विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.
 

इंटेक्स डिझायर BT ब्लूटुथ हेडफोनमध्ये इन-बिल्ट रिचार्ज होण्यासाठी बॅटरी दिली गेली आहे. ह्यात डिजिटल FM सुद्धा प्ले केले जाऊ शकते. हा हेडफोन खूप सहजपणे अॅडजस्ट केला जाऊ शकतो. ह्यात LED इंडिकेशनसुद्धा आहेत. हा LED चार्जिंग आणि पॉवर ऑनविषयी सूचना देतो.

हेदेखील वाचा – क्षणार्धात डेटा ट्रान्सफर करणारे हे आहेत काही महत्त्वपुर्ण आणि लोकप्रिय अॅप्स…

इंटेक्स डिझायर BT ब्लूटुथ हेडफोनचे वजन १९७ ग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की, हा हेडफोन 24Mb/s डाटा ट्रान्सफर रेट देतो. ह्याने कॉलिंग सुद्धा केली जाऊ शकते. ह्याच्या ब्लूटुथ रेंज ७ ते १० मीटर आहे.

हेदेखील वाचा – सॅमसंग गॅलेक्सी J3 V स्मार्टफोन लाँच, सुपर AMOLED HD डिस्प्लेने सुसज्ज
हेदेखील वाचा – वनप्लस 3 चा सॉफ्ट गोल्ड व्हर्जन जुलैमध्ये होणार विक्रीसाठी उपलब्ध

Poonam Rane Poyrekar

Content Writer - Marathi

Connect On :