नवीन ऑडिओ ब्रँड IKODOO ने भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त इअरबड्स लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन इयरबड्सची किंमत 999 रुपयांपासून सुरू होते, जी 4,999 रुपयांपर्यंत जाते. IKODOO Buds One आणि IKODOO Buds Z मध्ये तुम्हाला मिळणाऱ्या फीचर्स आणि बड्सच्या किमतीबद्दल सविस्तर माहिती घेऊयात.
IKODOO Buds One ची किंमत 4,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. यात, तुम्हाला Buds Z 999 रुपयांमध्ये मिळेल, दोन्ही बड्सची विक्री 31 मार्चपासून Amazon वर सुरू होईल. हे बाँड्स ग्रीन, व्हाईट आणि ब्लॅक या तीन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येतील.
या इअरबड्समध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी मोड मिळेल, ज्यामुळे तुम्हाला हवे तेव्हा तुमच्या आजूबाजूचे आवाज ऐकू येतील. तसेच, हे बड्स बाहेरील आवाज 50dB ने कमी करतील. कंपनीने या बड्स 13.4mm मोठ्या कंपोझिट डायनॅमिक ड्रायव्हर्ससह पॅक केले आहेत, जे संतुलित बास देतात. त्याबरोबरच, बड्स ट्रिपल माइक सिस्टम AI सक्षम ENC सपोर्टसह येतात. याशिवाय, तुम्हाला IKODOO ऍपद्वारे Find My Buds फिचर देखील सक्रिय करता येईल.
कंपनीचा दावा आहे की, हे बड्स फुल चार्ज झाल्यावर 27 तास चालतात आणि वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतात. याशिवाय, बड्स केवळ 10 मिनिटे चार्ज करून 2 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देतात.
हे कंपनीचे परवडणारे इअरबड्स आहेत, जे 10mm PEEK+PU ड्रायव्हर्ससह येतात जे 3D साउंड स्टेज इफेक्ट देतात. कॉलिंग दरम्यान सभोवतालचा आवाज कमी करण्यासाठी बड्समध्ये एआई ENC सपोर्ट आहे. एकदा पूर्ण चार्ज झाल्यावर, हे इयरबड्स 28 तासांपर्यंत चालतात. कंपनीने टच कंट्रोल, IPX4 रेटिंग आणि फास्ट पेयरिंगसाठी ब्लूटूथ आवृत्ती 5.3 सपोर्टसह हे बड्स लाँच केले आहेत.