तरुणाईमध्ये सध्या टेक गॅजेट्सचे भलतेच वेड दिसून येते. आजकाल स्मार्टवॉच, स्मार्ट ग्लास, इ. वेगवेगळ्या वेअरेबल्सने आपले लूक क्रिएट करायचे देखील ट्रेंड तरुणाईमध्ये सुरू आहे. यामध्ये ऑडियो गॅजेट्सचा म्हणजेच इयरबड्सचा देखील समावेश आहे. पण काही वेळा इअरबड्स नीट काम करत नाहीत किंवा त्यातील आवाज स्पष्ट होत नाही.
जर तुमच्या इअरबडमध्ये आवाज नीट येत नसेल, तर तुमच्या इअरबडमध्ये धूळ साचली असू शकते. अनेकदा लोक दिवसभर रस्त्यावरून प्रवास करताना इअरबडचा वापर करतात, त्यामुळे इअरबड्समध्ये घाण साचते. यामुळे, अनेक वेळा कनेक्ट केलेल्या व्हॉईस कॉलवर तुम्हाला इअरबडमध्ये प्रॉब्लम येतात. अशा परिस्थितीत, आपल्या इयरबड्सची काळजी कशी घ्यावी? त्यासाठी खाली दिलेले टिप्स फॉलो करा.
– सुती कापडाने इअरबड्सच्या बाहेरील बाजू हळूवारपणे स्वच्छ करा.
– यासोबतच इअरबड्सचे चार्जिंग केसही स्वच्छ करा.
– आपण कापूस देखील वापरू शकता, त्यात थोडेसे रबिंग अल्कोहोल मिसळा.
– त्यानंतर मऊ हातांनी कापसाने इअरबड्सच्या आतील बाजू हलक्या हाताने स्वच्छ करा.
– तसेच ब्रश वापरून इअरबड्समधील इअरवॅक्स स्वच्छ करा.
टीप : लक्षात घ्या की इअरबड्सचे चार्जिंग पोर्ट साफ करण्यासाठी रबिंग अल्कोहोल वापरू नका. जर तुम्हाला चार्जिंग केस साफ करायचा असेल तर फक्त ब्रशने स्वच्छ करा.