Crossbeats CURV ट्रू-वायरलेस इयरबड्स भारतीय बाजारपेठेत लाँच.
नवीन इयरबड्सची किंमत एकूण 1,599 रुपये.
क्रॉसबीट्स कर्व्हमध्ये 'रोटेट टू लॉक' फीचर देण्यात आले आहे.
कंज्युमर टेक्नॉलॉजी कंपनी Crossbeats ने Crossbeats CURV हे परवडणारे ट्रू-वायरलेस इयरबड्स भारतीय बाजारपेठेत लाँच केले आहेत. या इअरबड्सच्या हलक्या वजनाच्या आणि कर्व डिझाइनची किंमत 1,599 रुपये आहे. ए डिवाइस केवळ काळ्या रंगात उपलब्ध आहे. त्यांचे वजन फक्त 3.2 ग्रॅम आहे. हे डिवाइस कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहे.
क्रॉसबीट्स कर्व्ह स्लीक आणि अर्गोनॉमिक लूकचा दावा करतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 10mm निओडीमियम ड्रायव्हर आहे. यात एन्व्हरमेंट व्हॉइस कॅन्सलेशन फिचर देखील आहे, ज्यामुळे संगीत ऐकताना तुम्हाला बॅकग्राउंड नॉइज ऐकायला येणार नाही.
यामध्ये दिलेला ड्युअल माइक वापरकर्त्यांचा व्हॉईस कॉलिंग अनुभव सुधारतो. हे उपकरण ब्लूटूथ 5.1 सपोर्टसह येते. क्रॉसबीट्स कर्व्हमध्ये 'रोटेट टू लॉक' फीचर देण्यात आले आहे, ज्यामुळे ते कानात व्यवस्थित बसतात. दुसरीकडे, त्याचे स्विफ्ट ऑटो पेअरिंग कनेक्टिव्हिटी फिचर हे सुनिश्चित करते की, ते डिव्हाइसशी त्वरित कनेक्ट होईल.
कंपनीचा दावा आहे की, इयरबड्सची बॅटरी सलग 20 तासांचा म्युझिक प्लेबॅक देते. यात AI व्हॉईस असिस्टंट आणि हँड्स फ्री कॉलिंग सारखे फीचर्स देखील आहेत. इयरबड चार्ज करण्यासाठी यात टाइप-C चार्जिंग पोर्ट दिला गेला आहे. हे उपकरण Android आणि iOS दोन्ही उपकरणांसह कनेक्ट करता येईल.
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.