सध्या आपण बघतच आहोत की, भारतात Earbuds ची बाजारपेठ खूप वेगाने वाढत आहे. तरुणाई, ऑफिस वर्कर्स इ. सर्व नेहमीच्या जीवनातील ताण कमी करण्यासाठी गाणी ऐकणे किंवा फोन कानाला न लावता कॉलिंग करणे इ. कारणांसाठी इयरबड्सचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. भारतातील इयरबड्सच्या बाजारपेठेत भारतीय कंपन्यांचे वर्चस्व आहे. भारतात इअरबड्सची सरासरी किंमत 500 रूपये ते 20 हजार रुपयांपर्यंत आहे. लोकांच्या गरजेनुसार इअरबड हे एक आवश्यक उपकरण बनले आहे.
हे सुद्धा वाचा: Tips: नवीन Smartwatch खरेदी करायची आहे? या ‘5’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करा, बघा डिटेल्स। Tech News
तुमच्यापैकी अनेकांकडे इअरबड्स असतील आणि बरेच जण ते खरेदी करण्याचा विचार करत असतील. तर, या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला इअरबड्स खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत. इयरबड्स खरेदी करण्यापूर्वी पुढील ‘5’ महत्त्वाच्या गोष्टी नक्की चेक करा.
वायरलेस इयरबड खरेदी करताना सर्वप्रथम साउंड कॉलिटी तपासून घ्या. त्याचे बास, मिड्स कसे आहेत ते तपासा. त्याबरोबरच ड्रायव्हर साईज नक्की तपासा, कारण काहीवेळा तुम्हाला मोठ्या ड्रायव्हरसहही बास मिळत नाही आणि काहीवेळा लहान ड्रायव्हरसह तुम्हाला उत्तम बास मिळतो. याशिवाय नॉइज कॅन्सलेशन आणि ट्रान्स्परन्सी मोड तपासणे देखील गरजेचे आहे. साउंड कॉलिटीसाठी तुम्ही रिव्ह्यूज देखील तपासू शकता.
काही वेळा इअरबड तुम्ही व्यायाम किंवा रनिंग, जॉगिंग इ. ऍक्टिव्हिटीजसोबत वापरत असता. त्यामुळे, हे बड्स खरेदी करण्यापूर्वी घाम आणि पाणी प्रतिरोधक आहेत की नाही? हे तपासणे गरजेचे आहे. इयरबड्सचे IP रेटिंग तपासून घ्या.
वायरलेस इअरबड्स खरेदी करताना बड आणि चार्जिंग केस दोन्हीची बॅटरी लाइफ चेक करा. चार्जिंग केसमध्ये किमान 500mAh ची बॅटरी असावी, असे तज्ज्ञांचे मत आहे.
कनेक्टिव्हिटी ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. खरेदी करताना इयरबड्सच्या कोडेक्सची ब्लूटूथ आवृत्ती तपासून घ्या. याशिवाय, मल्टी डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देखील तपासणे आवश्यक आहे.
इयरबड्स खरेदी करण्यापूर्वी बड्सचे साईज तपासून घ्या. तुम्ही जे इअरबड्स खरेदी करणार आहात ते इन इयर, ऑन इयर किंवा ओव्हर द इयर आहेत, हे देखील तपासा. तुम्हाला माहितीच आहे की, इयरबड्ससोबत सिलिकॉन इअरटिप्स मिळतात. तर, त्या सिलिकॉन टिप्सची संख्या आणि साईज देखील चेक करा.