Bose QuietComfort 35 वायरलेस हेडफोन भारतात लाँच
Bose QuietComfort 35 वायरलेस हेडफोन काळ्या आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल.
अमेरिकेची ऑडियो डिवायसेस निर्माता कंपनी Bose ने भारतीय बाजारात QuietComfort 35 वायरलेस हेडफोन लाँच केला आहे. भारतात कंपनीने Bose QuietComfort 35 ह्या वायरलेस हेडफोनची किंमत २९,३६३ रुपये ठेवली आहे. Bose QuietComfort 35 वायरलेस हेडफोन कंपनीचा हेडफोन आहे, जो वायरलेस आणि नॉइज-कॅन्सलिंग तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. ह्याआधी लाँच झालेल्या हेडफोन्समध्ये एकतर वायरलेस टेक्नोलॉजी असायची किंवा नॉईज कॅन्सेलिंग टेक्नॉलॉजी. पण ह्या हेडफोनमध्ये तुम्हाला ह्या दोनही गोष्टी मिळत आहे.
कंपनीचा दावा आहे की, Bose QuietComfort 35 वायरलेस हेडफोन खूपच चांगला आहे. हा कंपनीच्या जुन्या हेडफोन्ससाखा नॉईज कॅन्सलिंग तंत्रज्ञानाने बनला आहे. हा ब्लूटुथ NFC सह येतो. ज्याने हा लवकर कनेक्ट होतो. ह्याची बॅटरी लाइप २० तास चालते आणि जर आपण हा केबलद्वारा वापरला , तर हा ४० तासांचा बॅटरी बॅकअप देऊ शकतो. हा हेडफोन काळ्या आणि चंदेरी रंगात उपलब्ध होईल.
हेदेखील वाचा – काय मिळतय विराट फॅनबॉक्सच्या आत? पाहा आमच्या नजरेतून….
कंपनीने Bose QuietControl 30 इन-इयर-नॉइज कॅन्सलिंग हेडफोन्स (26,438 रुपये), साउंडस्पोर्ट वायरलेस (13,275 रुपये) आणि साउंडस्पोर्ट वायरलेस पल्स (17,663 रुपये) सह लाँच केला आहे.
हेेदेखील वाचा – २९ जूनला होणार लेनोवो वाइब K5 स्मार्टफोनचा दुसरा फ्लॅशसेल
हेेदेखील वाचा – स्कलकँडी ग्राइंड वायरलेस ब्लूटुथ हेडफोन लाँच, किंमत ६,४९९ रुपये