boAt ने सादर केला डॉल्बी ऑडिओसह पहिला नेकबँड, किंमत आहे का बजेटमध्ये ?

Updated on 13-Jun-2023
HIGHLIGHTS

कंपनीने भारतात आपले नवीन वायरलेस नेकबँड boAt Nirvana 525ANC लाँच केले.

boAt Nirvana 525ANC ची किंमत 2,499 रुपये

Amazon India वर हे उपकरण खरेदीसाठी उपलब्ध आहे.

 boAt कंपनीची स्मार्टवॉच, नेकबँड, इयरबड्स इ. उपकरणे भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत. आता कंपनीने भारतात आपले नवीन वायरलेस नेकबँड boAt Nirvana 525ANC लाँच केले आहे. या नव्या नेकबँडचे नाव boAt Nirvana 525ANC आहे. तर याबाबत, कंपनीचा दावा आहे की डॉल्बी ऑडिओ सपोर्टसह येणारा हा जगातील पहिला वायरलेस नेकबँड आहे. 

boAt Nirvana 525ANC ची किंमत :

boAt Nirvana 525ANC ची किंमत 2,499 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. हे नेकबँड सेलेस्टियल ब्लू, कॉस्मिक ग्रे आणि स्पेस ब्लॅक कलरमध्ये एक वर्षाच्या वॉरंटीसह खरेदी करता येईल. त्याबरोबरच, कंपनीच्या अधिकृत वेबसाइटशिवाय Amazon India वर हे उपकरण खरेदीसाठी उपलब्ध आहे.  

boAt Nirvana 525ANC

वर सांगितल्याप्रमाणे, boAt Nirvana 525ANC डॉल्बी ऑडिओसह उपलब्ध आहे. यासाठी डॉल्बी आणि बोट यांनी पार्टनरशिप केली असल्याची माहिती मिळाली आहे. boAt Adaptive EQ देखील नेकबँडसह समर्थित आहे. त्याबरोबरच, डिवाइसमध्ये हायब्रीड ऍक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन ANC मिळणार आहे. यात क्लियर कॉलिंगसाठी Enx टेक्नॉलॉजी देखील आहे.

BoAt Nirvana 525ANC मध्ये 180mAh बॅटरी आहे, जी 30 तासांपर्यंत बॅकअप देते. डिवाइस 10 मिनिटांच्या चार्जिंगनंतर 10 तासांचा बॅकअप देईल, असा दावा कंपनीने केला आहे. यात वॉटर रेसिस्टन्टसाठी IPX5 रेटिंग आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :