प्रवासात कॅरी करण्यास सोपे आहेत ‘हे’ 4 परवडणारे ब्लूटूथ स्पीकर, Amazonवर बघा खास डिल्स

Updated on 11-Oct-2022
HIGHLIGHTS

प्रवासात कॅरी करण्यास सोपे पडतील असे ब्लूटूथ स्पिकर्स

AMAZONवर काही ब्लूटूथ स्पीकर अगदी परवडणाऱ्या किमतीत तुमच्यासाठी उपलब्ध

JBL, SONY स्पिकर्सचा यादीत समावेश

प्रवास करताना, एक उत्कृष्ट स्पीकर आपल्याबरोबर असणे नेहमीच आवश्यक असते, ज्यामुळे आपल्याला संपूर्ण वेळ मनोरंजनाची खात्री मिळते.तुम्ही पोर्टेबल स्पीकर्स खरेदी करू इच्छित असाल तर ही यात आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. AMAZONवर काही ब्लूटूथ स्पीकर अगदी परवडणाऱ्या किमतीत तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. आम्ही तुमच्यासाठी काही निवडक ब्लूटूथ स्पीकरची यादी तयार केली आहे.  

हे सुद्धा वाचा : Ram Setu : अक्षय कुमारच्या आगामी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बघा VEDIO

साधारणतः पोर्टेबल स्पीकर चांगला मानला जातो, जो तुम्हाला दीर्घकाळ मनोरंजनाची खात्री देतो. ब्लूटूथ स्पीकर्स नेहमीपेक्षा अधिक लोकप्रिय होत असल्याने, ऑडिओ कंपन्यांनी काही उच्च-गुणवत्तेचे आणि उच्च-कार्यक्षमतेचे पर्याय लाँच केले आहेत.

SONY SRS-XB13

Sony वायरलेस एक्स्ट्रा बास पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकरची लॉन्चिंग किंमत 4,999 रुपये आहे. परंतु Amazon वर 3,290 रुपयांना उपलब्ध आहे. स्पीकर्सवर 30% सूट दिली जात आहे. पूर्ण चार्ज केल्यावर ते 17 तास टिकू शकते. हे धरायला खूप हलके आणि अगदी कॉम्पॅक्ट आहे. पाणी आणि धुळाचा या स्पिकर्सवर काही परिणाम होणार नाही. येथून खरेदी करा… 

ZOOOK BASS WARRIOR

 प्रगत ब्लूटूथ 5.0 तंत्रज्ञानाने सुसज्ज, झूक बास वॉरियर लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेट आणि इतर सुसंगत ब्लूटूथ-सक्षम उपकरणांसह सहजपणे पेयर होईल. ब्लूटूथ नसलेली ऑडिओ उपकरणे 3.5 मिमी AUX केबलने जोडली जाऊ शकतात. Zook Bass Warrior TF कार्ड, AUX-in, BT सारख्या एकाधिक कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करते, आपल्या प्रियजनांसाठी हे उपकरण सर्वोत्तम भेट ठरेल. Zook Bass Warrior ब्लूटूथ स्पीकरमध्ये इनबिल्ट  मायक्रोफोन आहे, त्यामुळे तुम्ही ब्लूटूथशी कनेक्ट केलेले असताना हँड्सफ्री कॉलला उत्तर देऊ शकता. येथून खरेदी करा… 

MIVI OCTAVE 3

Mivi Octave 3 पोर्टेबल 16 W ब्लूटूथ स्पीकरची लॉन्चिंग किंमत 3,999 रुपये आहे, परंतु AMAZON वर ते 1,999 रुपयांना विकले जात आहे. स्पीकर्सवर 50% सूट दिली जात आहे. या स्पीकर्सवर 3.5 स्टार रेटिंग मिळाले आहे. म्हणजेच यूजर्सना ते खूप आवडले आहे. जर तुम्ही पोर्टेबल स्पीकर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथून खरेदी करा… 

JBL GO 2

JBL Go 2 वायरलेस पोर्टेबल ब्लूटूथची लॉन्चिंग किंमत 2,999 रुपये आहे परंतु Amazon वर 1,699 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. उपकरण आकाराने लहान आहे, पण आवाज मजबूत आहे. विशेष म्हणजे ते पाण्यातही खराब होणार नाही. म्हणजेच बाहेर पावसातही त्याचा वापर करता येईल. येथून खरेदी करा… 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :