यूट्युबने आपला नवीन ऑफलाइन फीचर लाँच केला आहे. ह्या फीचरला स्मार्ट ऑफलाइन नाव दिले गेले आहे. ह्या फिचरच्या माध्यमातून यूजर्स आपला आवडता व्हिडियो त्याचवेळी डाऊनलोड आणि सेव करु शकतो. हे डाऊनलोड तुम्ही रात्रीच्या वेळी करणे फायद्याचे असेल कारण रात्रीच्या वेळी अनेक टेलिकॉम कंपन्या स्वस्त किंमतीत इंटरनेट देतात. हे फीचर वापरण्यासाठी यूजर्सला ऑफलाइन बटन टॅप करावे लागेल. त्यानंतर आपल्याला “सेव ऑवर नाइट” पर्याय निवडावा लागेल. जेव्हा तुम्ही असे कराल, तेव्हा तुमचे युट्यूब व्हिडियो स्वत:हूनच रात्रीच्या वेळी व्हिडियो डाउनलोडिंगसाठी लावले जातात. तथापि, कंपनीेचे असे म्हणणे आहे की, युट्यूब हे फीचर वायफाय नेटवर्कवर काम करणार नाही. ह्या फीचरला खासकरुन एयरटेल आणि टेलिनॉरने मिळून बनवले आहे. कंपनीला आशा आहे की, लवकरच हा संपुर्ण भारतात लाँच केला जाईल.
यूट्युबचे प्रोडक्ट मॅनेजर, जेसिका Xu ने गुगलच्या अधिकृत ब्लॉगवर असे लिहिले आहे की, “ आम्ही नेहमी यूट्युबच्या ऑफलाइन फीचर्स जास्तीत जास्त यूजर्स फ्रेंडली बनविण्यावर काम करत आहोत. बरेचसे सब्सक्राइबर्स आपल्या यूजर्सला नाइट पॅक ऑफर करते आणि आम्ही यूजर्सला ह्याचाच वापर करण्यासाठी हे फीचर सादर केले आहे. हा त्यांच्यासाठी बोनसच आहे असे म्हटले तरी ते अयोग्य ठरणार नाही. कारण रात्रीच्या वेळी डाटा खूप स्वस्तात मिळते, त्यामुळे आपण त्याचवेळी आपले व्हिडियो डाउनलोड करु शकता.”
हेदेखील पाहा – 3GB रॅमसह येणारे १० बजेट स्मार्टफोन्स
यूट्युबने आपल्या ह्या फीचरला २०१४ मध्ये लाँच केले होते. आणि ह्याला iOS आणि अॅनड्रॉईड दोन्ही प्रकारे वापरु शकता. तुम्ही डाऊनलोड केलेला कंटेंट आपण यूट्युब अॅपच्या माध्यमातून ऑफलाइन पाहू शकता.
हेदेखील वाचा – लेनोवोच्या प्रोजेक्ट टँगोवर आधारित असलेला PHAB 2 प्रो स्मार्टफोन लाँच
हेदेखील वाचा – Envent LiveFree 570, 530 वॉटरप्रूफ ब्लूटुथ स्पीकर्स लाँच, किंमत अनुक्रमे ३९९९ रुपये, २४९९ रुपये