सध्या यूट्यूब चा नवीन फुल विड्थ थम्बनेल फीचर फक्त काही डिवाइस साठी उपलब्ध आहे.
YouTube Testing New Full Thumbnail Feature on its Android App: मागील काही वर्षांपासून यूट्यूब प्रसिद्ध प्लॅटफॉर्म्स पैकी एक आहे आणि याचा एंड्राइड अॅप सर्वाधिक वापरल्या जाणार्या एंड्राइड अॅप्स पैकी एक आहे. या प्लॅटफॉर्म वर असलेले पब्लिशर्स आता छोट्या छोट्या गोष्टींकडे पण लक्ष देत आहेत उदा. विडियो मधील पॉवरफुल थम्बनेल.
आता यूट्यूब थम्बनेल्स एंड्राइड अॅप वर एडजस्ट करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी सतत आपल्या एंड्राइड अॅप च्या UI मध्ये बदल करत असते आणि आता असे समोर येत आहे की आपल्याला अॅप मध्ये विडियो फीड चे थम्बनेल बदललेले दिसू शकतात.
यूट्यूब अॅप मध्ये तिन वेगवेगळ्या फीड्स असतात, होम फीड, ट्रेंडिंग फीड आणि सब्सक्रिप्शन फीड. होम फीड मध्ये ते विडियो दिसतात जे यूजर ने बघितलेल्या किंवा सब्सक्राइब्ड चॅनल्स शी संबंधित असतात. ट्रेंडिंग फीड मध्ये यूट्यूब वर ट्रेंड होत असलेले विडियो दिसतात आणि सब्सक्रिप्शन फीड मध्ये तुम्ही तुमच्या सब्सक्राइब्ड चॅनल्स ने पब्लिश केलेले विडियो बघू शकता.
आता पर्यंत थम्बनेल्सना वाइट बॉर्डर दिली जात होती पण आता या नवीन अपडेट नंतर थम्बनेल भोवती कोणतीही बॉर्डर नसेल आणि याची रुंदी आधीपेक्षा जास्त असेल.
9to5Google च्या रिपोर्ट्स नुसार हा फीचर सध्या फक्त काही डिवाइस वर उपलब्ध आहे आणि साध्यतरी हा फीचर सर्व डिवाइस वर उपलब्ध होणार नाही. पण लवकरच यूट्यूब सपोर्टेड मॉडल्स साठी हा फीचर जाहीर करू शकते.