YouTube नवीन जाहिरात धोरणाची गपचूप चाचणी करत आहे, जिथे विनामूल्य वापरकर्त्यांना एकामागून एक पाच जाहिराती दाखवल्या जाणार आहेत. आत्तापर्यंत, Google-मालकीचे व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म त्याच्या विनामूल्य वापरकर्त्यांना एकाच वेळी दोन जाहिराती दाखवत होते. मात्र आता एकाच वेळी पाच जाहिराती दाखवण्याची माहिती सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केली आहे. या नवीन बदलाची सध्या निवडक मोफत वापरकर्त्यांवर चाचणी केला जात आहे, अशी माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : Vodafone-Idea च्या 'या' प्लॅनमध्ये कमी किमतीत मिळेल दररोज 4GB डेटा, जाणून घ्या किंमत
ट्विटरवरील काही वापरकर्त्यांनी त्यांची माहिती दिली आहे की, ते यूट्यूबवर एकामागून एक पाच जाहिराती पाहत आहेत. निश्चितपणे या जाहिराती विनामूल्य वापरकर्त्यांना दिसत आहेत. असे दिसते की, YouTube गपचूपपणे नवीन जाहिरात धोरणाची चाचणी करत आहे. तक्रारकर्त्यांची संख्या फारच मर्यादित असल्याने, सध्या ते काही वापरकर्त्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे, असा अंदाज लावला जाऊ शकतो.
Twitter वापरकर्ता Mermaidvee (@BadGyalVeeVee) ने YouTube च्या अधिकृत ट्विटर हँडलला टॅग करत तिच्या तक्रारीत लिहिले, "म्हणून @YouTube दोन जाहिराती पुरेशा नव्हत्या आता तुम्हाला पाच जाहिराती चालवायची आहेत, कोणीही काळजी घेत नाही आणि मी जाहिरात स्किप करू शकत नाही."
https://twitter.com/BadGyalVeeVee/status/1567604465892528130?ref_src=twsrc%5Etfw
वर उल्लेख केलेल्या वापरकर्त्याच्या ट्विटला प्रतिसाद देताना, YouTube ने स्पष्ट केले की, अशा जाहिरातींना बंपर जाहिराती म्हणतात. ज्यामध्ये वापरकर्त्यांना एकामागून एक पाच जाहिराती दाखवल्या जातात. या जाहिराती 6 सेकंदांच्या आहेत आणि त्या वगळल्या जाऊ शकत नाहीत. ही बातमी सर्वप्रथम Gizmochina ने शेअर केली होती.
सध्या, YouTube ने अशा बंपर जाहिरातींच्या मोठ्या प्रमाणात रोलआउटबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही, त्यामुळे येत्या काळात सर्व विनामूल्य वापरकर्ते अशा प्रकारच्या जाहिराती पाहतील की नाही, हे सांगणे कठीण आहे.