YouTube वर व्हीडिओ पाहणे, बनवणे तसेच व्हिडीओजमधून बरेच काही शिकणे इ. कामांसाठी या प्लॅटफॉर्मचा वापर केला जातो. अनेक वापरकर्ते YouTube द्वारे चॅनेल्स तयार करून पैसे देखील कमवतात. अलीकडेच YouTube Shorts चे ट्रेंड वाढत चालले आहे. लांब व्हीडिओ पाहण्याऐवजी लोक शॉर्ट्स व्हिडिओज पाहण्यास प्राधान्य देतात. YouTube आता आपल्या वापरकर्त्यांना दीर्घकाळासाठी शॉर्ट्स अपलोड करण्याची परवानगी देत आहे.
Also Read: WhatsApp वर व्हिडिओ कॉलिंग होणार आता आणखी मजेशीर! बदलता येईल बॅकग्राउंड आणि फिल्टर्स
होय, लवकरच YouTube Shorts मोठ्या व्हिडिओंना सपोर्ट करेल. सध्या, वापरकर्ते 60 सेकंद किंवा एक मिनिट लांब शॉर्ट्स अपलोड करण्यास सक्षम आहेत. Google च्या ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने घोषणा केली आहे की, ते निर्मात्यांना आता तब्बल 3 मिनिटांचे शॉर्ट्स अपलोड करण्याची परवानगी देणार आहेत. वापरकर्ते या महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबर 2024 पासून या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
आम्ही तुम्हाला सांगतो की, YouTube ने ब्लॉग पोस्टद्वारे म्हटले आहे की, आता शॉर्ट्स तयार करणे आणि कनेक्ट करणे हे पूर्वीपेक्षा सोपे आणि अधिक मजेशीर असणार आहे. त्याबरोबरच, ब्लॉग पोस्टमध्ये कंपनीने सांगितले की, 15 ऑक्टोबर 2024 पासून, वापरकर्ते 3 मिनिटांपर्यंत YouTube शॉर्ट्स तयार करू शकतील. हे निर्मात्यांनी सर्वाधिक विनंती केलेले फिचर आहे.
या कारणास्तव कंपनी तुम्हाला तुमची गोष्ट सांगण्यासाठी अधिक वेळ देत आहे. हा बदल चौकोनी किंवा त्याहून मोठ्या व्हिडिओंना लागू होईल. तुम्ही काहीतरी नवीन तयार करू इच्छित असाल तर, हे टूल्स आणि 3 मिनिटे तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आणि आपल्या सब्सक्राइबर्ससह सहज कनेक्ट होण्यास आणि नवीनतम ट्रेंडसह अपडेट राहण्यास मदत करेल.
हा बदल तुम्ही 15 ऑक्टोबरपूर्वी अपलोड केलेल्या कोणत्याही व्हिडिओवर परिणाम करणार नाही. कंपनी येत्या काही महिन्यांत लाँग-शॉर्ट्ससाठी शिफारसी सुधारण्यासाठी काम करेल. याव्यतिरिक्त, YouTube वापरकर्ते टेम्पलेटसह त्यांचे आवडते शॉर्ट्स पुन्हा तयार करण्यास सक्षम असतील. थोडक्यात, हे टेम्पलेट वापरकर्त्यांना नवीन ऑडिओ आणि त्यांचे वेगळेपण जोडून नवीन ट्रेंड वापरण्यास मदत करतील.