लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन आणि खास बदल करणार आहे. कंपनीने मंगळवारी जाहीर केले की, "प्लॅटफॉर्मवर लवकरच YouTube शॉर्ट्ससाठी नवीन शॉपिंग फीचर समाविष्ट केले जाईल." या फीचरमध्ये तुम्हाला एफिलिएट मार्केटिंग आणि शॉर्ट्सद्वारे टॅग केलेली प्रोडक्ट्स खरेदी करण्याची सुविधा मिळेल. सध्या या फीचरची अमेरिका आणि भारतासह अनेक देशांमध्ये टेस्टिंग सुरू आहे.
हे सुद्धा वाचा : "शाहरुखचा 'Pathaan' चित्रपट फ्लॉप झाला नाही तर मी काम सोडणार", अभिनेत्याने केले चॅलेंज…
रिपोर्टनुसार, या फीचरद्वारे इन्फ्लूएंसर त्यांच्या प्रोडक्ट्सना शॉर्ट्स व्हिडिओंमध्ये टॅग करू शकतील, ज्यामुळे व्ह्युव्हर्सना शॉपिंग करणे सोपे होणार आहे. हे फिचर सध्या यूएसमधील निवडक इन्फ्लुएन्सर्ससाठी आणले आहे. त्याबरोबरच, अमेरिका, भारत, ब्राझील, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये या फिचरची टेस्टिंग सुरु आहे.
YouTube च्या नवीन फिचरवरून असा अंदाज लावता येतो की, प्लॅटफॉर्म लवकरच ई-कॉमर्स क्षेत्रातही आपला हात आजमावण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच कंपनीने टीव्हीसाठी YouTube Shorts चे फीचर जारी केले आहे.
या व्यतिरिक्त, गेल्या आठवड्यातच शॉर्ट व्हीडिओ प्लॅटफॉर्म TikTok ने देखील आपल्या ऍपवर शॉपिंग प्रोग्रामची टेस्टिंग सुरू केली आहे. यूट्यूबला टिकटॉकचे फीचर कॉपी करून शॉर्ट व्हिडीओ स्पर्धेत टिकून राहायचे आहे, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, भारत सरकारने जून 2022 मध्ये टिकटॉक ऍपवर बंदी घातली आहे.