घरी पूर्ण मनोरंजनाचा डबल डोस घेण्यासाठी सज्ज व्हा. गुगलचा व्हिडिओ प्लॅटफॉर्म YouTube यासाठी एक उत्तम फीचर घेऊन येत आहे. या फिचरच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या घरात उपस्थित असलेल्या मोठ्या स्क्रीन टीव्हीवर 60 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीच्या मनोरंजक YouTube शॉर्ट्सचा आनंद घेऊ शकतील. यूट्यूबचे हे नवीनतम फीचर 2019 किंवा नंतर लाँच झालेल्या टीव्हीवर काम करेल, अशी माहिती मिळाली आहे.
हे सुद्धा वाचा : त्वरा करा ! तब्बल 18 दिवसांच्या बॅकअपसह Amazfit Band 7 भारतात लाँच, स्वस्तात खरेदी करण्याची संधी
1- सर्वप्रथम टीव्हीवर YouTube ऍप उघडा.
2- टीव्ही रिमोटच्या मदतीने शॉर्ट्सवर जा. येथे तुम्हाला रिकमेंडेड YouTube शॉर्ट्स व्हिडिओ दिसतील.
3- येथे तुम्हाला जो व्हिडिओ बघायचा आहे त्यावर क्लिक करा.
4- वापरकर्ते इच्छित असल्यास, ते निर्मात्याच्या चॅनेलवर देखील जाऊ शकतात आणि शॉर्ट्स टॅबद्वारे YouTube शॉर्ट्स पाहू शकतात.
आत्तापर्यंत YouTube शॉर्ट्स टीव्हीवर उभ्या स्वरूपात प्ले केले जातात. तर टीव्ही लँडस्केप मोडमध्ये राहतो. अशा स्थितीत टीव्हीवर शॉर्ट्स पाहताना स्क्रीनच्या दोन्ही बाजूला बरीच काळी जागा असते. गुगलने या समस्येवरील उपाय एका ब्लॉगपोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.
ब्लॅक स्पेसशिवाय टीव्हीवर शॉर्ट्स प्ले करण्यासाठी अनेक यूजर इंटरफेस डिझाइन वापरून पाहिल्यानंतर, Google ने सानुकूलित शॉर्ट्स अनुभवाला अंतिम रूप दिले. शॉर्ट्स पाहताना ते स्क्रीनवरील ब्लॅक स्पेस उत्तमरीत्या मॅनेज करते. या डिझाइनमुळे टीव्हीवर शॉर्ट्स पाहण्याची मजा द्विगुणित होईल, असे गुगलने म्हटले आहे.