तथापि, यूट्युबचे अजूनही लाइव व्हिडियोचे फीचर सुरु आहे, मात्र हा फेसबुक आणि ट्विटरपेक्षाही खूप मागे आहे.
फेसबुक आणि ट्विटरच्या लाइव व्हिडियो फीचरने यूट्युबलासुद्धा आपल्याकडे आकर्षित केले आहे. त्यामुळे यूट्युब आपल्या नवीन लाइव व्हिडियो-स्ट्रीमिंग अॅपवर काम करत आहे. ह्याला यूट्युब कनेक्ट नावाने संबोधले गेले आहे. तथापि, वेंचरबीटच्या रिपोर्टमध्ये असेही सांगितले जातय की, यूट्युब कनेक्ट अॅपची बेसिक फंक्शनलिटी फेसबुकच्या लाइव व्हिडियो आणि ट्विटरच्या पेरिस्कोपसारखी असेल. तसेच यूट्युब ह्या अॅपला आयफोन आणि आयपॅड्स साठीही बनवत असल्याचे बोलले जातय.
रिपोर्टनुसार, गुगल फेसबुक आणि ट्विटरपेक्षा लाइव व्हिडियोमध्ये खूप मागे जात चालला आहे. तथापि, यूट्यूबजवळ आपला लाइव व्हिडियो पर्याय आधीपासूनच आहे. यूजर्स यूट्युब कनेक्टचा वापर यूट्यूब आणि gmail अकाउंटवरुनही करु शकतो. त्याचबरोबर ह्यात चॅटचेसुद्धा फीचर आहे. त्याचबरोबर ह्यात आपल्याला न्यूजफीडसुद्धा मिळते.
रिपोर्टमध्ये असेही सांगितले आहे की, आपण लाइव व्हिडियो यूट्युब कनेक्ट अॅप आणि यूट्युब वेबसाइट ह्या दोघांवरतीच पाहू शकतो. त्याचबरोबर ह्याच्या माध्यमातून आपण ह्या व्हिडियोला डाउनलोडसुद्धा करु शकता, जसे फेसबुकमध्ये होते.