क्रिएटर्स आणि यूजर्सची मज्जाच मजा ! आता YouTube वर मिळणार इंस्टाग्रामचे ‘हे’ जबरदस्त फिचर

क्रिएटर्स आणि यूजर्सची मज्जाच मजा ! आता YouTube वर मिळणार इंस्टाग्रामचे ‘हे’ जबरदस्त फिचर
HIGHLIGHTS

YouTube वर मिळणार इंस्टाग्रामचे फिचर

क्रिएटर्स आणि युजर्सकडे आता स्वतःचे अकाउंट हँडल असेल.

कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये नवीन फिचरची घोषणा केली

लोकप्रिय YouTube ऍप युजर्सच्या मनोरंजनासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असते. व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube लवकरच एक नवीन बदल करणार आहे, ज्यामध्ये सर्व युजर्सकडे त्यांचे अकाउंट हँडल असेल. YouTube लवकरच हे फीचर आणण्याची तयारी करत आहे. या फीचरमध्ये, Instagram, Twitter आणि TikTok सारख्या प्लॅटफॉर्मप्रमाणे युजर्सचे स्वतःचे अकाउंट हँडल असेल, ज्याच्या मदतीने वापरकर्ते इतर कोणत्याही युजरला मेंशन करू शकतात. हे फीचर लवकरच युजर्ससाठी रिलीझ केले जाऊ शकते. 

हे सुद्धा वाचा : iPhone SE4 आता 6 इंचपेक्षा मोठ्या स्क्रीनसह येऊ शकतो, डिटेल्स आले समोर

हे नवीन फिचर निर्मात्यांना दर्शकांच्या पसंती जाणून घेण्यास आणि त्यानुसार कंटेंट तयार करण्यास मदत करतील.यूट्यूबनेच या फीचरची माहिती दिली आहे. कंपनीने आपल्या अधिकृत ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, आम्ही निर्मात्यांसाठी एक नवीन फिचर आणत आहोत, जेणेकरुन त्यांचा कंटेंट योग्यरित्या डिझाइन केले जाईल आणि व्यूअर्ससोबत संवाद साधता येईल. 

यूट्यूबचे हे फीचर लवकरच येणार आहे. कंपनी वापरकर्त्यांना त्यांचे हँडल निवडण्यासाठी सूचित करेल. वापरकर्ते त्यांच्या पसंतीच्या नावासह त्यांचे हँडल निवडू शकतात. जर, एखाद्या वापरकर्त्याकडे आधीपासूनच या नावाचे हँडल असेल, तर त्याला इतर पर्यायांमधून नाव निवडण्याची सुविधा देखील मिळेल.

कंपनीच्या म्हणण्यानुसार सध्या क्रिएटर्स त्यांच्या चॅनेलच्या नावाने ओळखले जातात, आता त्यांच्याशी अकाउंट हँडलद्वारे संवाद साधला जाऊ शकतो, यामुळे वापरकर्ते आणि निर्माते यांच्यात अधिक चांगला संवाद होईल. अकाउंट हँडल रोल आउट झाल्यानंतर, सर्व YouTube क्रिएटर्स आणि व्यूअर्सचे स्वतःचे YouTube हँडल असेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo