आता यूट्यूब केवळ व्हिडियोज पुरता मर्यादित न राहता , तुम्ही तुमच्या मित्रांशा यूट्युबच्या ह्या नवीन मेसेजिंग अॅपद्वारा चॅट आणि शेअरसुद्धा करु शकाल.
जगातील सर्वात मोठी व्हिडियो साइट यूट्युब आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच करु शकतो, ज्यात यूट्युब यूजर्स आपल्या मित्रांशी चॅट आणि शेअर करु शकतील. ह्याचाच अर्थ आता यूट्युबमध्ये केवळ व्हिडियोचं नाही, तर चॅटसुद्धा केले जाऊ शकेल.
Wired नुसार, कंपनी लवकरच आपल्या ह्या फीचर “native sharing” साठी टेस्टिंग सुरु करेल. ज्यात यूट्युबच्या छोट्या ग्रुपमध्ये अगदी सहजपणे चॅट केले जाईल. ह्यात यूट्युब यूजर्स आपल्या मित्रांना ह्या फीचरशी जोडण्यासाठी निमंत्रण पाठवू शकतात. ह्या फीचरच्या माध्यमातून केवळ एकमेकांशीच चॅट करु शकाल. तसेच चॅटमध्ये व्हिडियोद्वारा बोलूही शकाल.
यूट्युबचा मुख्य उद्देश ह्या फीचरच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना यूट्युब अॅपशी जोडणे आहे. सध्यातरी अशा अनेक सेवा आहेत ज्यांनी आपल्या अॅपमध्ये चॅट फिचर जोडला आहे, जेणेकरुन यूजर्स जास्त वेळ जोडलेले राहतील. मागील वर्षी ऑगस्टमध्ये फ्लिपकार्टने पिंगला लाँच केले होते. ही सेवा खऱेदीदाराला एकदुस-याशी जोडण्याची संधी देते, जसे दुकानात होते.