WhatsAppवर येणार नवीन फिचर, गायब झाल्यानंतरही सेव्ह राहील तुमची WhatsApp चॅट

Updated on 27-May-2022
HIGHLIGHTS

WhatsAppवर Keep Messages हे नवीन फिचर येणार.

नव्या फीचरद्वारे सेव्ह राहील तुमची WhatsApp चॅट.

हे फिचर लवकरच Android, iOS आणि डेस्कटॉपच्या बीटा आवृत्तींमध्ये उपलब्ध होईल.

WhatsApp आपल्या युजर्सच्या प्रायव्हसी आणि सोयींची नेहमीच काळजी घेतो. त्यासाठी नेहमीच WhatsAppवर नवनवीन फीचर्स ऍड होत राहतात. आता इंस्टेंट मेसेजिंग ऍप WhatsAppने तुमच्या चॅटला प्राइवेट ठेवण्यासाठी डिसअपियरिंग मेसेजेस हे फिचर सादर केले. ते इनेबल केल्यानंतर चॅटमधील सर्व मॅसेजेस काही वेळानंतर गायब होतात. मात्र, यामध्ये सुविधेअंतर्गत आपले बरेच महत्त्वाचे मॅसेजेस डिलीट होतात. आता WhatsApp ही समस्या संपुष्टात आणतोय. चला तर जाणून घेऊयात नवीन फीचरबद्दल सविस्तर माहिती… 

Keep Messages फिचरबद्दल माहिती
 
मिळालेल्या माहितीनुसार, WhatsApp एका नवीन फीचर वर काम करत आहे. जो ग्राहकांना डिसअपियरिंग मोडमध्ये काही मॅसेजेस सिलेक्ट करण्याची सुविधा देईल, जे गायब न होता सेव्ह केले जातील. सध्या, या वैशिष्ट्याची चाचणी केली जात आहे. हे फिचर लवकरच Android, iOS आणि डेस्कटॉपच्या बीटा आवृत्तींमध्ये उपलब्ध होईल.

त्याबरोबरच, अहवालातील एका स्क्रिनशॉटमुळे हे समजते की, WhatsApp चॅटच्या प्रोफाइल पेजवर एक डेडिकेटेड सेक्शन जोडेल, जिथे सर्व 'Keep Messages' आढळतील. हा पर्याय Starred messages पर्यायाच्या खाली आणि Mute Notification या पर्यायाच्या वर असेल. हे स्क्रिनशॉट WhatsApp डेस्कटॉपवर घेतले गेले आहे. 

Keep Messages फिचर केवळ वैयक्तिक चॅटसाठी काम करणार नाही, तर ते ग्रुप चॅटवरही उपलब्ध असेल. जिथे अधिक महत्त्वाचे मॅसेजेस उपलब्ध असतात. हे फिचर सध्या चाचणीत असले तरी ते प्लॅटफॉर्मच्या बीटा व्हर्जनवर येण्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

 

  
 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :