फेसबुकने आपल्या यूजरसाठी फेसबुकवर पोस्ट केल्या गेलेल्या न्यूजला आणखी जास्त आकर्षक बनविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी फेसबुकने आपल्या UI ला आणखी जास्त आकर्षक बनविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी नवीन लेआउटसुद्धा बनवले गेले आहे आणि त्यावर कामही सुरु झाले आहे. सोशल मिडिया ट्विटरवर ह्याचे स्क्रीनशॉट घेऊन ह्याला अजून जास्त परिणामकारक बनविण्याचा सल्ला दिला गेला आहे. फेसबुक ह्यासाठी टेस्टिंग करत आहे. नवीन लेआऊट फेसबुकवरील बातमीला आणि लेखाला आणखी जास्त खास बनवेल. फेसबुक अॅपच्या तळाशी दिल्या गेलेल्या विभागात आपल्याला जगासोबतच अमेरिका, स्पोटर्स, फूडशी संबंधित माहिती मिळते. ह्या विभागात डिफॉल्ट सेटिंग दिली गेली आहे, ज्याला सार्वजनिक करण्याची तयारी चालू आहे. ज्यानंतर यूजर अगदी सहजपणे ह्यात लेख लिहू किंवा वाचू शकतात.
कंपनीने हे निश्चित केले आहे की, नवीन लेआउटची सध्यातरी चाचणी केली जात आहे. त्यामुळे हे सांगणे थोडे अवघड आहे की, ही सेवा कधी लाँच केली जाईल. फेसबुकच्या वक्त्यांनी असे सांगितले आहे की, “लोकांनी आम्हाला सांगितले आहे की, फेसबुकच्या ह्या नवीन पर्यायाला ते लोक जास्त पसंत करत आहे, ज्यांना सर्व प्रकारच्या गोष्टी, बातम्या वाचण्याची आवड आहे. म्हणूनच आम्ही ह्याला लोकांसाठी अजून इंटरेस्टिंग बनविण्यासाठी प्रयत्न करत आहोत, जेणेकरुन लोक ह्यात नवनवीन गोष्टी वाचू शकतील. ”
जगातील सर्वात मोठी सोशल नेटवर्किंग साइट सुरुवातीपासून स्वत:ला विकसित करत आहे, जेणेकरुन जास्तीत जास्त लोक फेसबुक, फ्रेंडली होतील. फेसबुकच्या वॉलवर जगभरातील लोक आपले नवीन विचार, कल्पना, भावना, फोटोज, व्हिडियोज शेअर करतात. आणि आता तर फेसबक UI पर्यंत पोहोचला आहे. जेथे यूजर लाइव व्हिडियो, 360 अंशातील व्हिडियो, बातम्या आदि पाहू शकतात आणि त्याला फॉलो करु शकतात. मग काय तुम्हाला असे वाटत का, की हा नवीन UI योग्य दिशेने काम करत आहे.
हेदेखील वाचा – १००० च्या किंमतीत येणारे सर्वोत्कृष्ट हेडफोन्स
हेदेखील वाचा – फ्लिपकार्ट सॅमसंग वीक: सॅमसंगच्या फोन्सवर मिळतोय आकर्षक डिस्काउंट