आपला इंटरनेट डाटा खर्च न करता असे पाहता येतील यू ट्युबवर व्हिडियो

आपला इंटरनेट डाटा खर्च न करता असे पाहता येतील यू ट्युबवर व्हिडियो
HIGHLIGHTS

काही दिवसांपूर्वी यूट्यूबने एक नवीन फीचर आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध केला आहे, ज्याला ऑफलाइन असे बोलले जातय. ह्या फीचरच्या माध्यमातून यूजर्स डाटा खर्च न करता कोणताही व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहू शकतात.

जेव्हा कधी आपल्याला इंटरनेटवर व्हिडियो पाहायचा असतो, किंवा कोणता तरी खास व्हिडियो बघायचा असतो, अशावेळी आपण सरळ ऑनलाइन व्हिडियो साइट Youtube वर जातो आणि व्हिडियो पाहतो. मात्र अनेकदा आपल्याला यू ट्युबवरील काही व्हिडियो खूप आवडतात आणि अशा वेळी आपल्याला तो अनेकदा पाहायची इच्छा होते. मात्र एकच व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहिल्याने आपला डाटाही त्याच वेगाने संपत जातो. पण तुम्हाला माहित आहे की, Youtube वर एक असा फीचर आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपला हा डाटा खर्च न करता तो व्हिडियो परत परत पाहू शकता.

 

काही दिवसांपूर्वी यूट्यूबने एक नवीन फीचर आपल्या यूजर्ससाठी उपलब्ध केला आहे, ज्याला ऑफलाइन असे बोलले जातय. ह्या फीचरच्या माध्यमातून यूजर्स डाटा खर्च न करता कोणताही व्हिडियो पुन्हा पुन्हा पाहू शकतात. Youtube चा ऑफलाइन फीचर यूजर्सच्या आवडीच्या व्हिडियोला फोन मेमरीमध्ये सेव्ह करतो. ह्याला यूजर्स कोणत्याही इंटरनेट कनेक्शनशिवाय अनेकदा ऐकू/पाहू शकतो. अशाप्रकारे अनेकदा व्हिडियो बघितल्याने तुमचा मोबाईल डेटासुद्धा खर्च होणार नाही. मात्र हे फीचर केवळ यू ट्यूबच्या अॅपमध्येच आहे. यूजर्स ह्याचा वापर वेब ब्राउजर्सवर करु शकणार नाही. जर आपण ह्या यूट्युबच्या फीचरचा वापर करु इच्छिता तर आम्ही ह्याविषयी खाली सविस्तर माहिती देत आहोत..

 

1. सर्वात आधी यूजर्सने आपला आवडीचा व्हिडियो यूट्यूब अॅपवर सर्च करा. नंतर डाऊनलोड बटणावर क्लिक करा.

 

2. त्यानंतर यूजर्सने ऑफलाइन व्हिडियो कोणत्या रिझोल्युशनमध्ये डाउनलोड करायचा आहे, त्यासाठी नॉर्मल किंवा हाय रिझोल्युशनमधील एक पर्याय निवडणे.

 

3. व्हिडियो डाऊनलोड झाल्यानंतर वरच्या दिशेला राइटचे निशान येईल. आता यूजर्स त्या व्हिडियोला मेन्यूूच्या ऑफलाइनवर जाऊन निवडू शकता.

 

4. आता यूजर्स ह्या व्हिडियोला ऑफलाइनही पाहू/ऐकू शकतो. आता हा व्हिडियो पाहताना डाटा खर्च होणार नाही. ह्या फीचरच्या माध्यमातून आपला खूप सारा डाटा वाचू शकतो.

Digit NewsDesk

Digit NewsDesk

Digit News Desk writes news stories across a range of topics. Getting you news updates on the latest in the world of tech. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo