भारतातील प्रमुख शहरांत आता गुगल मॅप्स ओला आणि उबर कॅब्सच्या भाड्याचा अंदाज आणि पिकअप वेळ पाहता येईल.
भारतातील प्रमुख शहरांत आता गुगल मॅप्स ओला आणि उबर कॅब्सच्या भाड्याचा अंदाज आणि पिकअप वेळ पाहता येईल. मात्र हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा यूजरच्या डिवाइसमध्ये ह्या कॅब्स प्रोवायडर्सचा अॅप इन्स्टॉल असेल.
ह्या सेवेच्या अंतर्गत उबर वापरणा-यांना उबरगो आणि उबर X मधील कोणत्याही सेवेचा लाभ घेता येईल. तर ओला वापरणा-यांना ओला मिनी, ओला मायक्रो आणि ओला सेडान मधील कोणताही पर्याय निवडू शकता. ह्यातील कोणत्याही सेवेवर क्लिक केल्यानंतर यूजर त्या अॅपवर आपोआप जाईल आणि सेवा वापरु शकता.
ह्याविषयी गुगलने माहिती दिली आहे की, जर आपल्याला एकाच ठिकाणाहून अनेक पर्याय पाहता येतील तेव्हा आपण त्यातील आपल्याला सोयीस्कर असा पर्याय निवडू शकता. तसेच तुमच्या संपुर्ण प्रवासासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल, ह्याची माहितीही तुम्हाला आधीच मिळेल आणि आपण आपल्यासाठी सर्वात स्वस्त आणि उत्कृष्ट पर्याय निवडू शकता.
सध्यातरी हे फीचर फक्त अॅनड्रॉईड डिवायसेसवरच उपलब्ध आहे. मात्र गुगलने अशी माहिती दिली आहे की, लवकरच हे फीचर iOS डिवायसेसवरही उपलब्ध होईल.