जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक फोन असतील तर तुम्ही त्यांवर देखील सहज तुमचे WhatsApp अकाउंट चालवू शकता. होय, आता असे करणे शक्य आहे. अलीकडेच WhatsApp चे नवीन फिचर जाहीर झाले आहे. ज्यामध्ये व्हॉट्सऍप खाते एकाच वेळी चार फोनमध्ये वापरता येणार आहे.
हे फिचर आधीपासूनच 'मल्टि डिवाइस' नावाने उपलब्ध होते. मात्र, यात प्रायमरी फोनशिवाय कंप्युटर आणि अँड्रॉइड टॅबलेट इ. वर चालवण्याची परवानगी होती. मात्र, नव्या फीचर्स द्वारे युजर्स आता त्यांचे खाते एकूण चार फोनवर वापरू शकतात. लवकरच फिचर सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे.
– सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये WhatsApp वर जा.
– यानंतर More वर जा आणि Linked device वर क्लिक करा.
– लिंक डिव्हाइसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पहिला फोन अनलॉक करावा लागेल.
– यानंतर तुमच्या प्रायमरी फोनने दुसऱ्या डिव्हाइसवरील QR कोड स्कॅन करा.
अशाप्रकारे तुम्हाला अन्य फोन्सवर खाते सक्रिय करता येणार आहे.
या नव्या फीचरनंतर तुम्ही तुमच्या इतर डिव्हाइसवर एक वर्ष जुने मॅसेज देखील पाहू शकणार आहात. या दरम्यान, तुमचा एक फोन बंद असला तरी तुम्ही दुसऱ्या फोनवर व्हॉट्सऍप सहज चालवू शकता. एक गोष्ट लक्षात घ्या की, तुमच्या चॅट्स, मीडिया फाइल्स आणि कॉल्स प्रत्येक फोनमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.
प्रायमरी फोनवर WhatsApp बऱ्याच कालावधीपर्यंत ऍक्टिव्ह असेल तर, इतर डिवाइसमधून खाते लॉग आऊट होईल. त्यानंतर परत दुसऱ्या डिवाइसवर खाते लॉग इन करायचे असेल तर केवळ लिंक्ड टू एक्सिस्टिंग डिवाइसवर टॅप करावे लागेल.