Instagram वर कोण ठेवतंय तुमच्यावर गुपचूप नजर? ‘या’ सोप्या पण महत्त्वाच्या ट्रिकद्वारे कळेल सर्व काही
Instagram हे एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे.
Instagram वर तुमच्या कोण कोण नजर ठेवताय हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का?
अशा लोकांची यादी तुम्ही इंस्टाग्राम ॲपमध्येच एका ट्रिकसह पाहू शकता.
आपणा सर्वांना माहितीच आहे की, Instagram हे एक लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. त्याबरोबरच, रील्स आणि अनेक प्रकारच्या कंटेंट क्रिएशनसाठी आजच्या काळात इंस्टाग्रामची क्रेझ खूप वाढली आहे. सध्या बरेच लोक त्यांचे नवीनतम फोटो आणि व्हिडिओ शेअर करण्यासाठी Instagram ॲप वापरतात. दरम्यान, असे काही लोक आहेत जे फक्त इतर वापरकर्त्यांना स्टॉक करण्यासाठी Instagram वापरतात. स्टॉकर्स इन्स्टावर तुम्हाला फॉलो करत नाहीत, तर शांतपणे तुमच्या प्रोफाइल पाहत असतात.
Instagram वर तुमच्या कोण कोण नजर ठेवताय हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? जर होय, तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आहात. या रिपोर्टमध्ये आम्ही तुम्हाला तुमच्या प्रोफाइलवर नजर ठेवणाऱ्या लोकांची यादी कुठे मिळेल, ते सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी ॲपचा अवलंब करण्याची गरज नाही. अशा लोकांची यादी तुम्ही इंस्टाग्राम ॲपमध्येच एका ट्रिकसह पाहू शकता.
Also Read: भारीच की! Lava Blaze Curve 5G वर मिळतोय 5,000 रुपयांपर्यंत Discount, जाणून घ्या ऑफर्स
Instagram वर कोण ठेवतंय तुमच्यावर नजर? जाणून घ्या पुढीलप्रमाणे:
- Instagram वर तुमचा पाठलाग कोण करत आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला स्मार्टफोनवर इन्स्टाग्राम ॲप ओपन करावे लागेल.
- यानंतर तुमच्या प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करा. आता वरच्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन ओळींच्या आयकॉनवर क्लिक करा.
- यानंतर, खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला Blocked चा पर्याय दिसेल. ब्लॉक केलेल्या पर्यायामध्ये तुम्ही ब्लॉक केलेली सर्व अकाउंट्स दिसतील.
- याच विभागात तुम्हाला तुमच्या स्टॉकर्सची यादी देखील पाहता येईल. यासाठी तुम्हाला ब्लॉक लिस्टमध्ये खाली स्क्रोल करावे लागेल.
- शेवटी तुम्हाला ‘You May Want to Block’ असा पर्याय दिसेल. या ऑप्शनवर जाताच तुमच्यासमोर एक नवीन यादी ओपन होईल.
- . या यादीमध्ये तुम्हाला इन्स्टाग्रामवर तुमच्यावर गुपचूप नजर ठेवणारे सर्व अकाउंट्स दिसतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile