लवकरच टेलिग्रामसारखे ‘चॅनल्स’ फिचर आणणार WhatsApp, कसे करेल काम ?

Updated on 28-Apr-2023
HIGHLIGHTS

इन्स्टंट मेसेजिंग ऍपचे 'WhatsApp चॅनेल' आगामी फिचर

नवीन फिचर पब्लिक टूल म्हणून काम करेल.

टेलीग्रामच्या चॅनल्स फिचर प्रमाणेच हे फिचर असेल.

WhatsApp लवकरच  टेलिग्रामसारखे 'चॅनल्स' फीचर सादर करण्याच्या तयारीत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सुमारे 1024 सहभागींना यात सहभागी होण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. कम्युनिटीव्यतिरिक्त, नवीन फिचर तुम्हाला समान स्वारस्य असलेल्या अनेक ग्रुप्सना एकत्रित करण्याची परवानगी देतो. आता मेटा टेलिग्रामसारखे हे फीचर WhatsApp वर आणण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर हे ऍप आणखी मोठ्या प्रमाणात वापरले जाणार आहे.

चॅनल्स फिचर

नवीन फीचर अँड्रॉइड आणि  iOS दोन्ही उपकरणांसाठी बनवले जात आहे. याबद्दलची माहिती पहिल्यांदा WABetaInfo वर आली आहे. तुम्ही टेलीग्राम किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर चॅनेल फीचर कसे काम करते याची तुम्हाला माहिती असेलंच. कारण WhatsApp चॅनल्सही तुम्ही पाहत किंवा करत असाल तसेचं काम करणार आहे.

कसे करेल काम ?

WhatsApp चॅनल्स हे एक ब्रॉडकास्टिंग टूल आहे, जे अनेक वेगवेगळ्या विषयांवर तयार केले जाऊ शकते. आता तुम्ही जर व्हॉट्सऍप वापरकर्ते असाल तर तुम्ही तुमच्या आवडीचा कोणताही विषय निवडून कोणत्याही चॅनेलला सबस्क्राईब करता येईल. 

 आपल्याला माहित आहे की चॅनेल्स सार्वजनिक साधन म्हणजेच पब्लिक टूल म्हणून काम करतात. या प्रकरणात, येथे पाठवलेले मॅसेजेस एंड-टू-एंड एनक्रिप्ट केलेले नाहीत. मात्र, जर आपण WABetaInfo बद्दल बोललो, तर ते कोणत्याही प्रकारे WhatsApp चॅट्सच्या एंड-टू-एंडमध्ये व्यत्यय आणणार नाही.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :