व्हॉट्सअॅपमध्ये लवकरच व्हिडियो कॉल सपोर्ट उपलब्ध होईल. जर्मनीच्या एक वेबसाइटने व्हाट्सअॅपच्या आयओएस अॅपचा स्क्रीनशॉट काढला आहे, जो एका व्हिडियो कॉलच्या रुपात आहे.
मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप आता जवळपास सर्वच लोक वापरतात. आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक व्हाट्सअॅपचा वापर करतात. सध्यातरी व्हाट्सअॅपने फक्त टेक्स मेसेजिंग आणि कॉल्सचं केले जाऊ शकतात. मात्र एका नवीन रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, लवकरच व्हॉट्सअॅपमध्ये व्हिडियो कॉलची सुविधासुद्धा असेल. ह्याला पुढील वर्षी रोलआऊट केले जाईल.
जो रिपोर्ट समोर आला आहे, त्यानुसार, व्हाट्सअॅपमध्ये लवकरच व्हिडियो कॉल सपोर्ट उपलब्ध होईल. जर्मनीच्या एका वेबसाइटने व्हॉट्सअॅपचे आयओएस अॅपचा स्क्रीनशॉट काढला आहे, जो एका व्हिडियो कॉलच्या रुपात आहे.
ह्या स्क्रीनशॉटच्या आधारावर असे सांगितले जाऊ शकते की, व्हॉट्सअॅपचे व्हिडियो कॉल फीचरचा इंटरफेस खूपच व्हॉईस कॉल सपोर्टच्या इंटरफेसपेक्षा जास्त आहे. इंटरफेसवर हिरव्या रंगाचे टॅब खूप जास्त दिसतायत. स्क्रीनशॉटमध्ये हेसुद्धा दिसत आहे की, यूजरला म्यूज करण्याचा विकल्प मिळेल आणि व्हिडियो कॉलदरम्यान कॅमेरासुद्धा स्विच करता येईल.
ह्या रिपोर्टमध्ये अशी माहिती दिली आहे की, व्हॉट्सअॅपच्या 2.12.16.2 आयओएस व्हर्जनला अंतर्गतरित्या टेस्ट केले जात आहे. ह्या व्हर्जनमध्ये कथितरित्या व्हिडियो कॉल सपोर्ट आहे. आतापर्यंत व्हिडियो कॉलला सपोर्ट करण्यासंबंधी व्हॉट्सअपकडून कोणतीही अधिकृत विधान केले गेले नाही.
व्हॉट्सअॅपने अॅनड्रॉईड यूजरसाठी ह्यावर्षी मार्च महिन्यापासून व्हॉइस कॉल सपोर्ट रोलआऊट करणे सुरु केले होते.