आता येणार मजा! WhatsApp वर तब्बल 31 लोकांना Video Call वर जोडण्याचे Feature | Tech News
WhatsApp वर लवकरच नवीन फिचर येणार, जो एकाच वेळी जास्तीत जास्त 31 लोकांना कॉल करण्याची परवानगी देईल.
31 लोकांपर्यंत ग्रुप कॉलिंग फीचर वापरकर्त्यांना मोठ्या ग्रुपशी सहजपणे कनेक्ट करण्यात मदत करेल.
हे फिचर विशेषतः बिजनेस मीटिंग्ज, व्हर्च्युअल फॅमिली गॅदरिंग्स किंवा मित्रांच्या मोठ्या गटाशी संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरेल.
WhatsApp आपल्या युजरच्या प्रायव्हसी सोबतच त्याच्या मनोरंजनाची देखील काळजी घेतो. WhatsApp ने नुकतेच एक नवीन फीचर आणले आहे. नव्या फीचरद्वारे ग्रुप कॉलिंगचा अनुभव आणखी मजेदार होईल, असा कंपनीचा दावा आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp ने एक नवीन फीचर सुरू केले आहे, जे एका वेळी जास्तीत जास्त 31 लोकांना कॉल करण्याची परवानगी देते.
WABetaInfo जी WhatsApp च्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणारी साईट आहे. त्यांच्या रिपोर्टनुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म कॉल्स टॅबमध्ये बदललेल्या इंटरफेससह 31 लोकांपर्यंत ग्रुप कॉलिंग फिचर आणत आहे, असे समजले.
Video Callवर 31 जणांना जोडण्याची सोय
आम्ही तुम्हाला सांगतो की, कॉल्स टॅबमधील नवीन बदलांमुळे व्हॉट्सऍप युजर्सना येत्या काळात स्क्रीनवर कॉल लिंक दिसणार नाहीत. तसेच, प्लस Icon सह फ्लोटिंग ऍक्शन बटण अपडेट होणे, अपेक्षित आहे. दरम्यान, 31 लोकांपर्यंत ग्रुप कॉलिंग फीचर वापरकर्त्यांना मोठ्या ग्रुपशी सहजपणे कनेक्ट करण्यात मदत करेल.
हे फिचर विशेषतः बिजनेस मीटिंग्ज, व्हर्च्युअल फॅमिली गॅदरिंग्स किंवा मित्रांच्या मोठ्या गटाशी संवाद साधण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. 31 लोकांपर्यंत ग्रुप कॉल फीचरची उपलब्धता वापरकर्त्यांना अधिक विस्तृत आणि सर्वसमावेशक ग्रुपसह संवाद साधण्यास मदत करेल. हे फिचर येत्या काळात सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आऊट केले जाणार आहे.
Video Avatar Calling
मागील आठवड्यात WABetaInfo ने Video Avatar Calling फिचरबद्दल माहिती दिली होती. हे फिचर लवकरच ऍपवर रोलआऊट केले जाणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या हे फिचर मर्यादित वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आले आहे. फीचरच्या नावावरूनच तुम्हाला कळले असेल की, या फिचरच्या मदतीने वापरकर्ते आता व्हिडिओ कॉलिंग दरम्यान त्यांचे अवतार वापरण्यास सक्षम असतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile