WhatsApp Web ला मिळाला Picture-in-Picture मोड: कसा करायचा वापर?
ज्या WhatsApp युजर्सना आपल्या फोन सोबतच आपला वॉट्सऍप आपल्या सिस्टम म्हणजे PC वर पण वापरायला आवडतो त्यांच्यासाठी आता एक नवीन फीचर आणण्यात आले आहे. आता तुम्ही ऍप्पच्या आतच नवीन ऍप्प किंवा कोणत्याही थर्ड पार्टी ऍप्प वर न जाता कोणताही विडियो इत्यादी बघू शकता.
महत्वाचे मुद्दे:
- वॉट्सऍप वेब वर आता तुम्हाला Picture-in-Picture मोड मिळाला आहे.
- आता तुम्ही वॉट्सऍपच्या आतच कोणताही विडियो कोणत्याही थर्ड पार्टी ऍप्प वर न जाता बघू शकता.
- आतापर्यंत हा फीचर मोबाईल फोन्ससाठीच उपलब्ध होता.
वॉट्सऍप वेब युजर्सना पण आता मोबाईल फोन युजर्सप्रमाणेच PIP म्हणजे पिक्चर-इन-पिक्चर मोड मिळाला आहे. हि माहिती WaBetaInfo च्या माध्यमातून आलेल्या एका रिपोर्ट मध्ये समोर आली आहे. याचा अर्थ असा की आता वॉट्सऍपच्या डेस्कटॉप वर्जन म्हणजे वेब वर्जन वर पण तुम्ही कोणत्याही इतर ऍप्प किंवा कोणत्याही थर्ड पार्टी ऍप्प वर न जाता वॉट्सऍपच्या आतच कोणताही विडियो जो तुम्हाला दुसऱ्या कोणीतरी पाठवला असेल तो बघू शकता. याआधी हा फीचर एंड्राइड ऍप्प साठी आला होता.
पिक्चर-इन-पिक्चर मोड टप्प्या टप्प्यात लागू केला गेला आहे आणि येत्या काही आठवड्यांत हा जगभरात प्रत्येक ठिकाणी लागू केला जाईल. जे लोक हे फीचर किंवा पिक्चर-इन-पिक्चर मोड आपल्या वेब म्हणजे सिस्टम यानी PC वर वपऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी आम्ही खाली याची माहिती दिली आहे की कशाप्रकारे याचा वापर करायचा.
वॉट्सऍप वेब वर कशाप्रकारे वापरायचा पिक्चर-इन-पिक्चर मोड
सर्वात आधी तुम्हाला लेटेस्ट वॉट्सऍप वेब वर्जन ची खात्री करून घ्यावी लागेल. याचा अर्थ असा की तुम्हाला सर्वात आधी वेब वॉट्सऍप चे लेटेस्ट वर्जन डाउनलोड करावे लागेल. हा PiP मोड वॉट्सऍप वेब वर्जन 0.3.1846.T साठी आणण्यात आला आहे.
यासाठी तुम्हाला वॉट्सऍप च्या सेटिंग मध्ये जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला हेल्प वर क्लिक करावे लागेल, पण लक्षात असू दे की हे नवीन वर्जन टप्प्या टप्प्यात लागू केले जात आहे त्यामुळे कदाचित तुम्हाला हे वर्जन मिळाले असेल. किंवा कदाचित तुम्हाला काही आठवडे वाट बघावी लागेल.
हे नवीन वर्जन आपल्या सिस्टम वर आणल्यानंतर बाद वॉट्सऍप वेब युजर्स कोणताही विडियो सेंड करू शकतात तसेच कोणताही विडियो रिसिव्ह पण करू शकतात आणि तो वेब वर्जन मधेच बघू पण शकतात.