चॅटमध्ये वैयक्तिक मॅसेज डिलीट करायला विसरलात? काळजी करू नका, WhatsApp वर आले नवे Best फिचर! Tech News 

 चॅटमध्ये वैयक्तिक मॅसेज डिलीट करायला विसरलात? काळजी करू नका, WhatsApp वर आले नवे Best फिचर! Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp ने ऑडिओ मॅसेजसाठी एक नवे फिचर आणले आहे.

या नव्या फीचरचे नाव 'व्यू वन्स' असे ठेवण्यात आले आहे.

नव्या फिचरद्वारे तुमचे व्हॉइस नोट्स अगदीच सुरक्षित राहणार आहेत.

WhatsApp सध्या अनेक कारणांनी असतात चर्चेत आहे. आता इन्स्टंट मॅसेजिंग ऍपने आपला प्लॅटफॉर्म सोयीस्कर बनवण्याकरीता ऑडिओ मॅसेजसाठी एक नवीन फीचर आणले आहे. या नव्या फीचरचे नाव ‘व्यू वन्स’ असे ठेवण्यात आले आहे. तुम्हाला तर माहितीच आहे की, याआधी WhatsApp ने फोटो आणि व्हिडिओसाठी हे फीचर जारी केले होते. आता यासह, वापरकर्त्याने ऑडिओ मॅसेज ऐकल्यानंतर ते व्हॉइस नोट आपोआप हटविले जातील. हे नवे फिचर वापरकर्त्यांसाठी खूप उपयुक्त ठरेल, असा दावा कंपनीने केला आहे.

व्ह्यू वन्स फिचर

WhatsApp ने आपल्या अधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, व्ह्यू वन्स फिचरसह वापरकर्त्यांना आता व्हॉईस नोटच्या पुढे ‘वन टाइम’ असे चिन्ह दिसणार आहे. ज्यावर क्लिक केल्यास हे सुनिश्चित होईल की, तुमचे संपर्क फक्त एकदाच हा मॅसेज ऐकू शकतील. ऐकल्यानंतर, व्हॉइस मॅसेज स्वयंचलितपणे हटविला जाणार आहे. यासह, युजर्सच्या व्हॉइस नोट्स लीक होणार नाहीत. फोटो आणि व्हिडिओंप्रमाणे, व्हॉइस मॅसेज देखील एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतील.

आम्ही तुम्हाला सांगतो की, तुमचे व्हॉइस नोट्स अगदीच सुरक्षित राहणार आहेत. कारण, असे मेसेज फॉरवर्ड करता येत नाहीत आणि सेव्ह देखील करता येत नाहीत. एवढेच नाही तर, याचे स्क्रीनशॉट घेणे तर शक्यच नाही. लक्षात घ्या की, हे नवे फिचर ग्लोबली लाँच झाले आहे. येत्या काळात लवकरच हे फिचरसर्व युजर्ससाठी आणले जाईल.

”आम्ही 2021 मध्ये फोटो आणि व्हिडिओसाठी व्ह्यू वन्स फीचर लाँच केले. यामुळे वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त प्रायव्हसी लेयर मिळाली. आम्‍ही आता ऑडिओ मॅसेजसाठी देखील हे फिचर आणले आहे याचा आम्हाला खूप आनंद होत आहे.”, असे मत कंपनीने व्यक्त केले आहे.

नवे फिचर वापरण्यासाठी पुढील प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा:

WhatsApp could soon add audio support to its screen sharing feature: Know more

सर्वप्रथम WhatsApp ओपन करा. आता तुम्हाला ज्या व्यक्तीला व्हॉइस नोट पाठवायचा आहे, त्यांची चॅट विंडो ओपन करा. यानंतर मायक्रोफोन आयकॉन वर क्लिक करून तुमचा मॅसेज रेकॉर्ड करा. आता तुमच्यासमोर एक ग्रीन बटन येईल, ज्याच्या पुढे तुम्हाला व्यू वन्स मोड ऍक्टिव्ह करण्यासाठी पर्याय दिसेल. हे ऑप्शन सिलेक्ट केल्यावर सेंड बटनवर क्लिक करा.

अशाप्रकारे तुम्ही प्रायव्हसीची काळजी न करता व्हॉइस नोट पाठवू शकता. संपर्कांनी ती व्हॉइस नोट एकदा ऐकल्यानंतर आपोआप हटवण्यात येणार आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo