WhatsApp सतत नवनवीन फीचर्ससह आपल्या यूजर्सचा अनुभव मजेदार बनवत आहे. अलीकडेच लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग Appने त Channel ग्लोबली लाँच केले आहे. त्यानंतर, आता कंपनीने असे एक खास फीचरबद्दल घोषणा केली आहे, त्यासह व्हीडिओ कॉलिंगदरम्यान खरी मजा येणार आहे. आता कंपनीने नवीन 'Video Avtar Calling' नावाचे फिचर आणले आहे.
मेटा मालकीच्या WhatsApp ने हे फिचर रोल आऊट करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, सध्या हे फिचर मर्यादित वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आले आहे. फीचरच्या नावावरूनच तुम्हाला कळले असेल की, त्याच्या मदतीने वापरकर्ते आता व्हिडिओ कॉलिंग दरम्यान त्यांचे अवतार वापरण्यास सक्षम असतील.
https://twitter.com/WABetaInfo/status/1702432202167046169?ref_src=twsrc%5Etfw
WABetainfo या Appच्या आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणाऱ्या वेबसाइटने आपल्या ताज्या अहवालात या नवीन फीचरच्या रोल आउटबद्दल माहिती दिली आहे. अहवालामधेय तुम्ही हे फिचर कसे वापरण्यास सक्षम असाल हे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. व्हिडिओ अवतार कॉलिंग फिचर वापरकर्त्यांना व्हिडिओ कॉल दरम्यान डायनॅमिक व्हिडिओ अवतारसह त्यांचे अवतार बदलण्याची परवानगी देईल.
– अहवालात दिलेल्या माहितीनुसार तुम्ही अवतारावर स्विच करता तेव्हा ते तुमच्या चेहऱ्यावरील हावभावाची जशी च्या तशी नक्कल करणार आहे.
– कॉल दरम्यान अवतार वापर असताना व्हिडिओ कॉल एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असेल. त्यामुळे काळजी करू नका, तुम्ही कधीही व्हिडिओवर स्विच करण्यास सक्षम असाल.
हे फीचर तुमच्या अकाउंटसाठी आले आहे की नाही? हे जाणून घ्यायचे असेल, तर व्हिडिओ कॉल करण्याचा प्रयत्न करा किंवा कॉलिंग स्क्रीनमध्ये अवतार बटण उपलब्ध झाली की नाही, ते बघा. कारण, हे फिचर सध्या काही बीटा युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. भविष्यात ते सर्व वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येईल.