WhatsApp : आता तब्बल 4 उपकरणांवर एकाच वेळी वापरता येईल व्हॉट्सऍप, ते सुद्धा ऑफलाईन

Updated on 25-Mar-2023
HIGHLIGHTS

WhatsApp वर येणार नवीन महत्त्वाचे फिचर

युजर्स WhatsAppला 4 डिव्हाइसेसशी लिंक करू शकतात.

आता विंडोज वापरकर्त्यांना डेस्कटॉपद्वारे व्हॉइस किंवा व्हिडिओ कॉल सुरू करण्याची परवानगी

WhatsApp ने आपल्या वापरकर्त्यांसाठी फोन लिंक करण्याची प्रक्रिया आता सोपी केली आहे. मेटा-मालकीच्या प्लॅटफॉर्मने खास Windows साठी डिझाइन केलेले नवीन ऍप जारी केले आहे. विंडोज डेस्कटॉपसाठी नवीन WhatsApp मोबाइल ऍपसारखेच आहे आणि अनेक उपकरणांवर ऍप वापरण्यासाठी जलद आणि अखंड अनुभव देते, असे म्हटले जाते. WhatsApp ने जाहीर केले आहे की, वापरकर्ते आता त्यांचे WhatsApp खाते तब्बल चार फोनशी लिंक करू शकतात.

हे सुद्धा वाचा : Noise ColorFit Pro 4 निम्म्या किमतीत खरेदी करण्याची संधी, लिमिटेड टाइम ऑफर !

WhatsApp चे नवीन मल्टी-डिव्हाइस फिचर

WhatsApp ने आपल्या ताज्या ट्विटमध्ये जाहीर केले की, " नो चार्जर, नो प्रॉब्लम. तुम्ही आता WhatsApp ला चार फोनपर्यंत लिंक करू शकता, जेणेकरून तुमचा फोन ऑफलाइन असतानाही तुमच्या चॅट्स सिंक, एनक्रिप्टेड आणि ऍक्सेस करता येतील." 

Windows डेस्कटॉपवर WhatsApp ऍप अपडेट केल्यानंतर, वापरकर्त्यांना व्हिडिओ आणि व्हॉइस कॉलिंग पर्याय आणि जवळजवळ सर्व डिव्हाइसेससाठी डिव्हाइस लिंकिंगसह नवीन फीचर्समध्ये प्रवेश मिळेल. तुम्हाला तुमचे WhatsApp खाते एकाहून अधिक फोनवर वापरायचे असल्यास, तुमचे खाते तुमच्या प्राथमिक मोबाइल फोनशी लिंक करण्यासाठी पुढील प्रक्रिया स्टेप बाय स्टेप फॉलो करा.

WhatsApp वर एकाधिक उपकरणे कशी लिंक कराल ?

– तुमच्या फोन नंबरशी लिंक असलेल्या तुमच्या प्राथमिक डिव्हाइसवर WhatsApp उघडा.

– 'सेटिंग्ज' वर जा आणि 'Linked Devices' निवडा.

– 'Link a New Device' वर टॅप करा आणि ऑन-स्क्रीन सूचनांचे अनुसरण करा.

– विंडोज डेस्कटॉपसारखे दुसरे उपकरण कनेक्ट करण्यासाठी, वेब ब्राउझरवर (web.whatsapp.com) WhatsApp वेब पेज ओपन करा.  

– वेब पेजवरील QR कोड तुमच्या दुसऱ्या डिव्हाइससह स्कॅन करा.

– उपकरणे समक्रमित होण्याची प्रतीक्षा करा. आता तुमच्या चॅट दुसऱ्या डिव्हाइसवर दिसतील.

– अधिक उपकरणे लिंक करण्यासाठी समान प्रक्रिया करा. 

– तुम्ही जास्तीत जास्त 4 डिव्‍हाइसेस एकत्र लिंक करू शकता आणि लिंक केलेले डिव्‍हाइस जोपर्यंत इंटरनेटशी जोडलेले आहेत, तोपर्यंत ते तुमच्या WhatsApp खात्याशी जोडलेले असतील.

WhatsAppवरून लॉग आउट करून तुम्हाला डिव्हाइस अनलिंक देखील करता येईल. तुम्ही एका वेळी चार लिंक केलेले डिव्हाइस आणि एक फोन वापरू शकता.

पुढील बाबी लक्षात ठेवा

यासह, तुम्ही एकावेळी चार लिंक केलेल्या डिवाइसवर ऍप वापरू शकता. तुमचे वैयक्तिक मॅसेज, मीडिया आणि कॉल्स एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड आहेत. प्रत्येक लिंक केलेला फोन WhatsApp शी स्वतंत्रपणे कनेक्ट होतो आणि प्रायव्हसी आणि सिक्योरिटी एन्ड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे त्याचप्रकारे ठेवतो. 

लक्षात घ्या की लिंक केलेल्या डिव्हाइसवर WhatsApp वापरण्यासाठी तुमच्या फोनला ऑनलाइन राहण्याची गरज नाही. मात्र, तुम्ही 14 दिवसांपेक्षा जास्त काळ तुमचा फोन वापरत नसल्यास तुमचे लिंक केलेले डिव्हाइस लॉग आउट केले जातील. याव्यतिरिक्त, तुम्हाला तुमचे WhatsApp खाते नोंदणीकृत करण्यासाठी आणि नवीन डिव्हाइसेस लिंक करण्यासाठी तुमच्या प्राथमिक फोनची गरज आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :