WhatsApp Update: आणखी मजेशीर होणार चॅट्स! आता नावाशिवाय बनवता येईल ग्रुप

WhatsApp Update: आणखी मजेशीर होणार चॅट्स! आता नावाशिवाय बनवता येईल ग्रुप
HIGHLIGHTS

युजर्स प्लॅटफॉर्मवर नावाशिवाय ग्रुप तयार करू शकतात.

वापरकर्त्यांनी नावाशिवाय ग्रुप तयार केल्यास, ते फक्त 6 पार्टीसिपेन्ट्स जोडू शकतील.

येत्या आठवड्यात हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल.

WhatsApp आपल्या युजर्ससाठी नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतो. आम्ही तुम्हाला सांगतो की याआधी कंपनीने आपल्या यूजर्सना प्लॅटफॉर्मवर HD क्वालिटीमध्ये फोटो शेअर करण्याची सुविधा दिली होती. ऍपने आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर जोडले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्स प्लॅटफॉर्मवर नावाशिवाय ग्रुप तयार करू शकतात. मेटाचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी ही माहिती दिली आहे. 

नावाशिवाय बनवता येणार ग्रुप

WhatsApp ने सांगितले की, आता ग्रुपमध्ये 1,024 सहभागी जोडण्याची सुविधा आहे. त्यानंतर नवा फीचर रोल आऊट झाल्यानंतर वापरकर्त्यांनी नावाशिवाय ग्रुप तयार केल्यास, ते फक्त 6 पार्टीसिपेन्ट्स जोडू शकतील. कंपनीने पुढे म्हटले आहे की, निनावी ग्रुपमधील प्रत्येक वापरकर्त्याला ग्रुपचे नाव वेगवेगळे दिसेल, जे त्यांच्या फोनवर संपर्क सेव्ह केलेल्या नावावर अवलंबून असणार आहे. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप WhatsApp ने हे फीचर लाँच केले आहे. मात्र हे फिचर अद्याप वापरकर्त्यांसाठी रोलआउट केलेले नाही. येत्या आठवड्यात हे फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध केले जाईल.

अलीकडेच लाँच झालेले महत्त्वाचे फीचर्स 

यापूर्वी कंपनीने चॅनल फीचर जागतिक स्तरावर लाँच केले होते. हे फिचर स्टेटसच्या पुढे दिसेल. याद्वारे वापरकर्ते व्हॉट्स ऍपवर त्यांच्या आवडीची कम्युनिटी तयार करू शकतात आणि त्यांच्याशी संवाद साधू शकतात. यापूर्वी, कंपनीने वापरकर्त्यांच्या प्रायव्हसीसाठी चॅट लॉक फीचर देखील आणले आहे. 

आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो की, वापरकर्ते त्याच्या मदतीने ऍप मधील कोणतेही चॅट लॉक करू शकतात. याचा फायदा असा होईल की, तुमचे चाट लॉक केल्यावर कोणालाच वाचता येणार नाहीत. चॅट लॉक करण्यासाठी, तुम्हाला लॉक करायच्या असलेल्या चॅटमध्ये जा. येथे तुम्हाला चॅट लॉक करण्याची सुविधा मिळेल.

वर सांगितल्याप्रमाणे, कंपनीने अलीकडेच आपल्या यूजर्सना प्लॅटफॉर्मवर HD क्वालिटीमध्ये फोटो शेअर करण्याची सुविधा दिली आहे. HD मध्ये फोटो पाठवण्याची सुविधा देण्यापूर्वी कंपनीने स्क्रीनशेअर फीचरची घोषणा केली होती. या फिचरद्वारे, वापरकर्ते WhatsApp वर व्हिडिओ कॉल दरम्यान झूम आणि टीम्स सारख्या इतर वापरकर्त्यांसह त्यांची स्क्रीन शेअर करू शकतात.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo