WhatsApp Update: गेल्या काही काळापासून WhatsApp मध्ये अनेक नवीन फीचर्स समाविष्ट होत आहेत. लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप नवीन फीचर्ससह आणखी उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण बनले आहे. दरम्यान, आता कंपनी आणखी एका नवीन फीचरवर काम करत आहे. आतापर्यंत वापरकर्त्यांना ग्रुप्समध्ये ‘Events’ शेड्यूल करण्याची सुविधा होती. मात्र लवकरच ते सिंगल चॅटमध्येही इव्हेंट्स शेड्यूल करू शकतील. आगामी फिचरबद्दल सविस्तर माहिती-
Also Read: नवीनतम Poco X7 सिरीज अखेर भारतात लाँच, 50MP कॅमेरासह मिळतील अनेक दमदार फीचर्स
WhatsApp ऍक्टिव्हिटीज आणि आगामी फीचर्सवर लक्ष ठेवणारी वेबसाइट WABetainfo ने आपल्या ताज्या अहवालात चॅट्स इव्हेंट फीचरबद्दल माहिती दिली आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमध्ये अहवाल पाहू शकता. अहवालानुसार, गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेल्या नव्या बीटा अपडेटवरून असे दिसून आले आहे की, WhatsApp वैयक्तिक चॅटमध्ये इव्हेंट तयार करण्यासाठी एक फीचर आणण्यावर काम करत आहे.
हे फिचर अजूनही डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे आहे, जे आगामी अपडेट्ससह रोलआऊट केले जाईल. सध्या, वापरकर्त्यांना हे वैशिष्ट्य वापरण्यासाठी बराच वेळ वाट पहावी लागेल. कारण हे फीचर्स आधी बीटा युजर्ससाठी आणले जाणार आहे.
WhatsApp Chats Event चा वापर तुम्ही वर दिलेल्या स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता. वरील स्क्रीनशॉटनुसार, वापरकर्त्यांना चॅट्समध्ये अटॅच फाइल टॅब अंतर्गत इव्हेंटचा पर्याय मिळणार आहे. तुम्हाला पोल ऑप्शन जवळ हा नवा पर्याय मिळेल. यावर क्लिक करून तुम्ही ग्रुप्सप्रमाणेच चॅटसाठी इव्हेंट्स शेड्यूल करण्यास सक्षम असाल. सर्वप्रथम तुम्हाला शेड्युल करायचे असलेल्या इव्हेंटसाठी नाव द्यावे लागणार आहे. यासह तुम्ही डिस्क्रिप्शन देण्यास देखील सक्षम असाल. यानंतर कार्यक्रम कोणत्या दिवशी होईल ते सिलेक्ट करा.
एवढेच नाही तर, वापरकर्ते इव्हेंट संपण्याची वेळ देखील निवडण्यास सक्षम असतील. अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या मित्रांसाठी किंवा कुटुंबातील सदस्यांसाठी कोणताही इव्हेंट सहजपणे शेड्यूल करण्यास सक्षम असाल. किंवा, नव्या फिचरद्वारे तुम्ही एखादे महत्त्वाचे काम विसरणार सुद्धा नाही.