WhatsApp: आता चॅट बॅकअपसाठी कोणतीही अडचण येणार नाही, फक्त QR कोड स्कॅन करून होईल काम

Updated on 20-Jun-2024
HIGHLIGHTS

WhatsApp वर युजर्सच्या सोयीसाठी दररोज नवनवीन फीचर्स अपडेट येत असतात.

नव्या अपडेटद्वारे WhatsApp युजर्सचे Google ड्राइव्हवरील अवलंबित्व संपुष्टात येईल.

फक्त QR कोड स्कॅन करून चॅट्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर ट्रान्सफर होतील.

मेटा-मालकीचे WhatsApp आपल्या युजर्सच्या सोयी सुविधांसाठी नेहमीच काम करत असते. आपण सर्वांना माहितीच आहे की, काही कालावधीच्या अंतराने WhatsApp वर नवीन अपडेट्स जारी केले जातात. जेणेकरून वापरकर्त्यांचा अनुभव पूर्वीपेक्षा चांगला होतो. आता कंपनी अशा फीचरवर काम करत आहे, ज्यानंतर नवीन WhatsApp यूजर्सची सर्वात मोठी समस्या दूर होईल.

Also Read: ड्युअल सेल्फी कॅमेरासह लेटेस्ट Xiaomi 14 Civi ची भारतात सेल सुरु, मिळेल भारी Discount। Tech News

WhatsApp वर नवीन वापरकर्त्यांना चॅट्स ट्रान्सफर करताना खूप त्रास होतो. पण नवीन अपडेटनंतर ही समस्या दूर होईल. होय, WhatsApp लवकरच चॅट बॅकअपसाठी नवा नवी सुविधा आणण्याच्या तयारीत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात नव्या फीचरबद्दल सविस्तर माहिती-

WhatsApp

WhatsApp चॅट्स QR कोडद्वारे ट्रान्सफर होणार

जर तुम्हाला तुमच्या WhatsApp चॅट्स वारंवार डिलीट होण्याची भीती वाटत असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. WhatsApp आता एका फीचरवर काम करत आहे. ज्यानंतर फक्त QR कोड स्कॅन करून चॅट्स एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर ट्रान्सफर करता येतील. अशा परिस्थितीत, WhatsApp युजर्सचे Google ड्राइव्हवरील अवलंबित्व संपुष्टात येईल.

WhatsApp च्या आगामी फीचर्स आणि ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणाऱ्या WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, नवीन फीचर Android च्या बीटा व्हर्जन 2.24.9.19 वर दिसले आहे. जेव्हा एखादे युजर आपला फोन बदलतो आणि दुसऱ्या फोनवर WhatsApp इन्स्टॉल करतो. तेव्हा त्याला लॉगिन दरम्यान QR कोडचा पर्याय मिळेल. हा कोड स्कॅन करून चॅट्स जुन्या डिव्हाइसवरून नवीन डिव्हाइसवर ट्रान्सफर केले जाऊ शकतात. WhatsApp ने या फीचरची माहिती खूप आधी दिली होतो. युजर्ससाठी नवे फिचर कधी येणार? या संदर्भात कोणतीही माहिती नाही परंतु हे फीचर खूप उपयुक्त ठरेल.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :