मेटाच्या मालकीचे मॅसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp ग्राहकांसाठी एक विशेष आणि कमाल फिचर आणणार आहे. होय, YouTube सारख्या व्हिडिओ स्किप फीचरची चाचणी WhatsApp करत आहे. या फिचरच्या मदतीने, वापरकर्ते व्हिडिओच्या सर्वात महत्वाच्या भागापर्यंत त्वरीत पोहोचू शकतील आणि व्हिडिओ पुढे आणि मागे वगळण्यास सक्षम होतील. अशाप्रकारे युजर्सना पूर्ण व्हीडिओ बघण्याची गरज नाही आणि त्यांच्या वेळेची सुद्धा बचत होईल.
WABetaInfo, WhatsApp च्या आगामी आणि प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या एका सुप्रसिद्ध टिपस्टर प्रकाशनानुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म Android वर बीटा टेस्टर्ससाठी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड व्हिडिओ वगळण्यासाठी एक नवीन फिचर आणत आहे.
या फिचरसह, वापरकर्ते स्क्रीनच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोनदा टॅप करून फॉरवर्ड आणि बॅकवर्ड Video वगळण्यास सक्षम असतील. हे फीचर जसे YouTube वर चालते तसेच ऍपवर सुद्धा काम करेल, ही पद्धत वापरकर्त्यांना आधीपासूनच परिचित आहे. नवीन व्हिडीओ स्किप फीचरमुळे वापरकर्ते पाठवलेले आणि मिळालेले व्हिडिओ अधिक सोयीनुसार पाहू शकतील.
म्हणजेच, वापरकर्ते व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे त्वरीत जाण्यासाठी पुढे जाण्यास आणि चुकलेला भाग पाहण्यासाठी रिवाइंड करण्यास सहजरित्या सक्षम असतील. यापैकी काहीही करण्यासाठी तुम्हाला प्रोग्रेस बारवर अवलंबून राहण्याची गरज नाही. तुम्ही फक्त टॅप करून हे काम करू शकता.
हे वैशिष्ट्य केवळ वेळेची बचत करणार नाही तर कंटेंट पाहण्याची पद्धत अगदी सोपी आणि सहज करणार आहे. हे फिचर वापरकर्त्यांना अधिक चांगली सुविधा देईल, जी पूर्वी WhatsApp मध्ये उपलब्ध नव्हती. लवकरच हे फिचर सर्व WhatsApp वापरकर्त्यांसाठी रोल आऊट होणार आहे.