WhatsApp आपल्या यूजर्ससाठी सातत्याने नवीन फीचर्स आणत आहे. वृत्तानुसार, ऍप वापरकर्त्याचा अनुभव अधिक आनंददायक बनवण्यासाठी एक किंवा दोन नव्हे तर तीन नवीन टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल्स विकसित करत आहे. या नव्या टूल्ससह वापरकर्त्याला काही कामे करणे अत्यंत सोपे होणार आहे. ही सर्व टूल्स भविष्यात येणाऱ्या अपडेट्ससह वापरकर्त्यांसाठी प्रसिद्ध केली जातील. आगामी टूल्सबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख शेवटपर्यंत वाचा.
WABetainfo ही WhatsAppचे आगामी फीचर्स ट्रॅक करणारी वेबसाईट आहे. या वेबसाइटने नुकत्याच दिलेल्या अहवालात नवीन टेक्स्ट फॉरमॅटिंग टूल्सचा उल्लेख करण्यात आला आहे. ते अजूनही विकासाच्या टप्प्यात आहेत. याद्वारे कंपनीला मेसेजिंग ऍप आणखी चांगले बनवायचे आहे. वर सांगितल्याप्रमाणे, WhatsApp असे तीन टूल्स विकसित करत आहे, ज्याद्वारे भविष्यात टेक्स्ट आणि चॅटिंगचा अनुभव पूर्णपणे बदलेल. चला तर बघुयात नव्या टूल्समध्ये तुम्हाला विशेष काय मिळू शकते.
https://twitter.com/WABetaInfo/status/1693404242076221628?ref_src=twsrc%5Etfw
WABetainfo ने आपल्या ट्विटर अकाउंटवर दिलेल्या पोस्टमधील स्क्रिनशॉटनुसार, टेक्स्ट एका वेगळ्याच फॉरमॅटमध्ये दिसतोय. WhatsApp वर कोड लावून शेअर करणे आणि वाचणे आणखी सोपे करण्यासाठी डिझाइन केलेले पहिले म्हणजे 'कोड ब्लॉक' टूल होय. हे सॉफ्टवेअर डेव्हलपर, प्रोग्रामरशी संबंधित असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त असणार आहे, असे सांगण्यात आले आहे. दुसरे, 'कोट' टूल वापरकर्त्यांना चॅटमधील विशिष्ट संदेशाला हायलाईट करण्यास मदत करेल. तर, तिसरे टूल वापरकर्त्यांना केवळ आयटमची सूची तयार करण्यास अनुमती देईल.
वरील सर्व टूल्स WhatsApp डेस्कटॉपच्या आगामी बीटा आवृत्तीसाठी प्रसिद्ध केली जातील. यानंतर ते स्थिर आवृत्तीसाठी देखील आणले जातील. सध्या वापरकर्त्यांना त्यांच्यासाठी आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. कारण नवे फिचर टप्प्याटप्प्याने तुमच्या पुढे सादर होतील.