WhatsApp New Feature: चॅट करणे होणार अधिक मजेशीर! तुमच्या प्रियजनांना लगेच मिळेल स्टेटस नोटिफिकेशन। Tech News 

WhatsApp New Feature: चॅट करणे होणार अधिक मजेशीर! तुमच्या प्रियजनांना लगेच मिळेल स्टेटस नोटिफिकेशन। Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp एक नवीन फीचर जोडण्याची तयारी करत आहे.

नव्या WhatsApp फिचरचे नाव Status Mention फिचर असे आहे.

ज्या वापरकर्त्यांना स्टेटस मेन्शन टूलद्वारे स्टेटसमध्ये टॅग केले जाईल, त्यांना नोटिफिकेशन जाईल.

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून काम करत आहे. अलीकडेच मेसेजिंग ॲपने टेस्टिंगसाठी नवीन इंटरफेससह स्टेटस टॅब जारी केला आहे. आता WhatsApp एक नवीन फीचर जोडण्याची तयारी करत आहे, ज्याद्वारे वापरकर्ते त्यांच्या स्टेटसमध्ये संपर्क जोडण्यास सक्षम असतील, ज्यांना ते स्टेटस दर्शवू इच्छित आहेत. आगामी फिचरद्वारे स्टेटस पाहण्याची शैली पूर्णपणे बदलेल आणि चॅट करणे देखील अधिक मजेशीर होईल.

हे सुद्धा वाचा: BSNL वापरकर्त्यांसाठी Good News! आता 999 रुपयांच्या प्लॅनची वैधता देखील वाढली, मिळतात Unlimited बेनिफिट्स

WhatsApp Status Mention फिचर

वरील रिपोर्टवरून असे दिसून येते की, WhatsApp च्या आगामी फिचरचा मागोवा घेणारी वेबसाइट Wabetainfo ने आपल्या अहवालात सांगितले की, WhatsApp अपडेटमध्ये एक नवीन टूल दिसले आहे. याद्वारे व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये संपर्कांना टॅग केले जाऊ शकते. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, ज्या वापरकर्त्यांना स्टेटस मेन्शन टूलद्वारे स्टेटसमध्ये टॅग केले जाईल, त्यांना नोटिफिकेशन जाईल. याद्वारे त्यांना थेट प्लॅटफॉर्मवर स्टेटस पाहता येणार आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, हे फीचर रोल आऊट झाल्यास प्लॅटफॉर्मवरील वापरकर्त्यांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल आणि त्यांना स्टेटस पाहण्यासाठी स्टेटस टॅबवर वारंवार जावे लागणार नाही. आगामी फिचर अजूनही डेव्हलपमेंट झोनमध्ये आहे. हे फीचर लवकरच बीटा वापरकर्त्यांसाठी आणले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टेस्टिंग पूर्ण झाल्यानंतर फिचर सर्व वापरकर्त्यांसाठी रिलीज केले जाईल.

WhatsApp new feature beta 2024
WhatsApp new feature beta 2024

WhatsApp चे नवे फिचर

मेसेजिंग ॲप WhatsApp ने अलीकडेच बीटा वापरकर्त्यांसाठी अपडेटेड पिन फिचर जारी केले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या फिचरद्वारे आता प्लॅटफॉर्मवर तीन ऐवजी पाच चॅट एकाच वेळी पिन करता येतील. सध्या या फीचरची टेस्टिंग सुरू आहे. लवकरच हे फिचर Android आणि iOS वापरकर्त्यांसाठी आणले जाईल, अशी अपेक्षा आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo