WhatsApp : नवीन अपडेट ! एकाच स्क्रीनवर एकाच वेळी अनेकांशी चॅट करा

WhatsApp : नवीन अपडेट ! एकाच स्क्रीनवर एकाच वेळी अनेकांशी चॅट करा
HIGHLIGHTS

मल्टी विंडो चॅट फीचरची चाचणी सध्या सुरु आहे.

व्हॉट्सऍपचे हे अपडेट वेब आणि टॅबसाठी जारी होणार

ऍपने अलीकडेच चार डिव्हाइस लिंक्सचे अपडेट जारी केले .

WhatsApp आपल्या अँड्रॉइड यूजर्ससाठी सतत नवनवीन फीचर्स आणि अपडेट आणत असते. परत एकदा आता व्हॉट्सऍप एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे नवीन अपडेट आल्यानंतर यूजर्स एकाच वेळी अनेक चॅट्स पाहू आणि चॅट करू शकणार आहेत. व्हॉट्सऍपचे हे अपडेट वेब आणि टॅबसाठी जारी केले जाईल, अशी माहिती मिळाली आहे. या मल्टी विंडो चॅट फीचरची चाचणी सध्या सुरु आहे.

मल्टी विंडो चॅट फीचर

WABetaInfo ने या नव्या फीचरबद्दल माहिती दिली आहे. नवीन फीचरला 'साइड-बाय-साइड मोड' असे नाव देण्यात आले आहे. या मोडमध्ये एकाच स्क्रीनवर अनेक चॅट्स एकाच वेळी ओपन करता येणार आहेत. हे फिचर एका प्रकारचे स्प्लिट स्क्रीनसारखेच असणार आहे.

साइड-बाय-साइड मोड

नवे साईड बाय साईड मोड युजर्ससाठी एका भेटवस्तू प्रमाणेच आहे. हे फिचर कधीही एनेबल आणि डिसेबल करता येणार आहे. यासाठी व्हॉट्सऍपमध्ये तुम्हाला काही सेटिंग कराव्या लागतील. सेटिंगसाठी तुम्हाला चॅट सेटिंगमध्ये जाऊन Side-by-side viewsच्या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. या नवीन फीचरची चाचणी सध्या WhatsApp बीटा अँड्रॉइड 2.23.9.20 आवृत्तीवर सुरू आहे. 

हे फीचर वापरकर्त्यांसाठी कधी रोलआऊट होणार, याबाबत सध्या कोणतीही माहिती पुढे आलेली नाही. ऍपने अलीकडेच चार डिव्हाइस लिंक्सचे अपडेट जारी केले आहेत. याद्वारे चार वेगवेगळ्या फोनमध्ये WhatsApp वापरता येणार आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo