WhatsApp दररोज नवीन फीचर्सचा परिचय करून देत आहे. त्याबरोबरच, WhatsApp आपल्या युजर्सची प्रायव्हसी आणि सिक्योरिटीची काळजी घेतो. होय, WhatsApp सतत सिक्योरिटी अपडेट्स आणत असतो, ज्याद्वारे वापरकर्त्यांची गोपनीयता राखली जाऊ शकते. आता सध्या WhatsApp द्वारे नवीन सिक्युरिटी अपडेटवर काम केले जात आहे. हे नवीन फीचर या वेळी Android आणि iOS साठी बीटा स्टेजमध्ये आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, WABetaInfo ने या फीचरची माहिती सर्वप्रथम इंटरनेटवर दिली होती. हे फीचर सध्या अँड्रॉइड आणि iOS साठी व्हॉट्सऍपच्या बीटा व्हर्जनसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सऍप कॉलिंग फंक्शनॅलिटीमध्ये हे फीचर आणल्यानंतर आता एक नवीन सिक्योरिटी स्तर यासह जोडला जाणार आहे. हे फिचर विशेषत: WhatsApp मध्ये नवे सिक्योरिटी फिचर जोडण्याचे उद्दिष्ट ”वापरकर्त्यांना हॅकर्स आणि फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सुरक्षित ठेवता येईल”, हे होय.
हे नवीन फीचर ऍड करण्यासाठी म्हणजेच सिक्युरिटी लेयर जोडण्यासाठी तुम्हाला आधी प्रायव्हसीमध्ये जावे लागेल. त्यानंतर, तुम्हाला Advance सेटिंग्जमध्ये जावे लागेल, येथे तुम्हाला एक नवीन टॉगल मिळेल. तुम्ही हे फिचर ऑन करताच, तुमचे सर्व कॉल्स एंड-टू-एंड एनक्रिप्टेड होतील. यानंतर WhatsApp ला देखील तुमच्या कोणत्याही संभाषणात प्रवेश करण्याची परवानगी नाही. या फीचरच्या मदतीने WhatsApp ने यूजर्सची प्रायव्हसी वाढवली आहे. मात्र लक्षात घ्या की, याचा तुमच्या कॉल कॉलिटीवर काही परिणाम होण्याची शक्यता आहे.
लक्षात घ्या की, हे टॉगल यावेळी प्रत्येकासाठी उपलब्ध नाही. जर तुम्ही बीटा व्हॉट्सऍप वापरत असाल तर नक्कीच तुम्हाला हे टॉगल दिसू शकते. तर भविष्यात ही सुविधा सर्वांना उपलब्ध करून दिली जाईल. हे फीचर ग्राहकांची गोपनीयता आणि सुरक्षितता वाढवण्यासाठी सादर केले जाणार आहे.