WhatsApp Privacy: आता युजर्स सहजपणे त्यांचे खाते सुरक्षित करण्यास सक्षम, लवकरच येणार नवे फिचर 

WhatsApp Privacy: आता युजर्स सहजपणे त्यांचे खाते सुरक्षित करण्यास सक्षम, लवकरच येणार नवे फिचर 
HIGHLIGHTS

WhatsApp युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीसाठी नेहमी अपडेट आणत असतो.

नव्या अपडेटमध्ये कंपनी WhatsApp Privacy Checkup स्क्रीन उघडण्यासाठी एक फीचर आणत आहे.

नव्या फीचरच्या मदतीने यूजर्स सहज प्रायव्हसी कंट्रोल करू शकतील.

लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp आपल्या युजर्सच्या प्रायव्हसी आणि सिक्योरिटीसाठी नेहमी अपडेट आणत असतो. आता यूजर्सची प्रायव्हसी लक्षात घेऊन WhatsApp मध्ये एक नवीन पर्याय सादर करण्यात येणार आहे. त्याच्या मदतीने युजर्स Privacy Checkup स्क्रीनवर सहज पोहोचू शकतात. म्हणजेच कंपनी वापरकर्त्यांना सेटिंग्जमध्ये एक नवीन पर्याय देण्यावर काम करत आहे. हे नवे फिचर भविष्यातील अपडेटसह आणले जाईल. वाचा सविस्तर-

Privacy Checkup फिचर

WhatsApp च्या आगामी फीचर्स आणि सर्व ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणाऱ्या WAbetainfo या वेबसाइटने एका आगामी फीचरची माहिती दिली आहे. वेबसाइटच्या ताज्या अहवालानुसार असे लक्षात आले आहे की, नव्या अपडेटमध्ये कंपनी WhatsApp Privacy Checkup स्क्रीन उघडण्यासाठी एक फीचर आणत आहे. तुम्ही खाली दिलेल्या पोस्टमधील स्क्रिनशॉटमध्ये हे बघू शकता.

वर दिलेल्या स्क्रीनशॉटबद्दल बोलायचे झाल्यास, नवे Privacy Checkup स्क्रीन ओपन करण्यासाठी ॲपच्या सेटिंग्जमध्ये पर्याय कोठे दिला जाईल, हे दिसत आहे. स्क्रीनशॉटनुसार ॲप ओपन केल्यानंतर आणि सेटिंग्जमध्ये गेल्यावर Advanced अंतर्गत Privacy Checkup चा पर्याय दिला जाईल. तुमच्या माहितीसाठी सांगतो की, येथून यूजर्स प्रायव्हसी कंट्रोल करू शकतील. तसेच, तुम्ही स्वतःसाठी योग्य सेटिंग निवडण्यास सक्षम असाल.

मात्र, लक्षात घ्या की, मेटाच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग ॲपचे हे फिचर अद्याप डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. हे फिचर निवडक बीटा वापरकर्त्यांसाठी भविष्यातील WhatsApp अपडेट्ससह टेस्टिंग ऑप्शन्स म्हणून प्रथम आणले जाईल. त्यानंतर हे फीचर सर्व युजर्ससाठी स्टेबल व्हर्जनवर आणले जाईल.

WhatsApp
WhatsApp

या फिचरच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या WhatsApp अकाउंटसाठी योग्य प्रायव्हसी सेटिंग्ज सेट करून सहजपणे सुरक्षित करू शकतील. याशिवाय व्हॉट्सॲप अनेक नवीन फीचर्सवरही काम करत आहे. WhatsApp च्या काही आगामी महत्त्वाच्या फीचर्सच्या टेस्टिंगदेखील सुरु झाल्या आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo