WhatsApp चे खास फिचर! इंटरनेटशिवाय पाठवता येतील फोटो, Video आणि मोठ-मोठ्या फाइल्स। Tech News 

WhatsApp चे खास फिचर! इंटरनेटशिवाय पाठवता येतील फोटो, Video आणि मोठ-मोठ्या फाइल्स। Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp वर लवकरच येणार अप्रतिम आणि महत्त्वाचे फिचर

WhatsApp वापरकर्त्यांना ऑफलाइन असताना देखील फोटो, व्हिडिओ, म्युझिक आणि डॉक्युमेंट्स इ. शेअर करू शकतील.

WhatsApp चे हे आगामी फीचर एंड टू एंड एन्क्रिप्टेड असणार आहे

WhatsApp एका नव्या आणि अप्रतिम नवीन फीचरवर काम करत आहे, जो सामान्य युजर्ससाठी अगदी महत्त्वाचा असणार आहे. WhatsApp असे एक फिचर विकसित करत आहे, जे व्हॉट्सॲप वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शनशिवाय फाईल्स शेअर करण्याचे स्वातंत्र्य देईल. थोडक्यात असेही म्हणता येईल की, लवकरच तुम्ही इंटरनेटशिवायही इन्स्टंट मॅसेजिंग ऍपवर फाइल्स शेअर करता येईल. एका लीकमधून मेसेजिंग ॲपच्या या फिचरबद्दल माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा: लेटेस्ट itel S24 स्मार्टफोन परवडणाऱ्या किमतीत भारतीय बाजारात लाँच, 108MP कॅमेरासह मिळतील Powerful फीचर्स। Tech News

whatsapp new feature works without internet

लीकनुसार, WhatsApp युजर्स ऑफलाइन असताना देखील फोटो, व्हिडिओ, म्युझिक आणि डॉक्युमेंट्स इत्यादी शेअर करू शकतील. सध्या इंटरनेटशिवाय व्हॉट्सॲपवर कोणतीही फाईल शेअर करता येत नाही.

WhatsApp चे आगामी फिचर

WhatsApp च्या ऍक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवणारी साईट WABetaInfo च्या अहवालात असे म्हटले आहे की, WhatsApp कथित फीचरवर सक्रियपणे काम करत आहे. जेणेकरुन वापरकर्ते इंटरनेट कनेक्शनशिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या फाइल्स एकमेकांसोबत शेअर करू शकतील. याशिवाय, हे फीचर एंड टू एंड एन्क्रिप्टेड असणार आहे, असे देखील बोलले जात आहे. सोप्या भाषेत असे म्हणता येईल की, म्हणजेच कोणीही तुम्ही शेअर केलेल्या फाइलसोबत कोणत्याही प्रकारे छेडछाड करू शकत नाही.

ब्लूटूथद्वारे काम करेल नवे फिचर

How to share WhatsApp status to other apps: Easy guide

जवळपासची उपकरणे शोधण्याव्यतिरिक्त WhatsApp ला तुमच्या फोनवरील सिस्टम फाइल्स आणि फोटो गॅलरीमध्ये ऍक्सेस करण्यासाठी देखील परवानगी आवश्यक असेल. इतर डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी पुरेशी जवळ आहेत की नाही हे तपासण्यासाठी ॲपला लोकेशन परवानगीचीही आवश्यकता असणार आहे. या परवानग्या असूनही शेअरिंग प्रक्रिया सुरक्षित असल्याची खात्री करून WhatsApp फोन नंबर हाईड करून शेअर केलेल्या फाइल्स एन्क्रिप्ट करेल. हे नवीन फिचर ShareIT सारखे पीअर-टू-पीअर फाइल-शेअरिंग ॲप्स जसे कार्य करत होते त्याप्रमाणेच आहे.

WhatsApp चे नवे फिचर कधीच रोल आऊट होणार हे अद्याप जाहीर करण्यात आले नाही. परंतु ते आधीपासूनच बीटा टेस्टिंगमध्ये असल्याने हे फिचर लवकरच सादर केले जाईल, अशी अपेक्षा आहे. या नवीन फीचरमध्ये जगभरातील WhatsApp वापरकर्त्यांसाठी फाइल शेअरिंग अधिक सोयीस्कर आणि सुरक्षित करण्याची क्षमता आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo