Good News! iPhone Users खास तुमच्यासाठी WhatsApp आणतोय अप्रतिम फीचर्स, बदलेल संपूर्ण स्वरूप? Tech News 

Good News! iPhone Users खास तुमच्यासाठी WhatsApp आणतोय अप्रतिम फीचर्स, बदलेल संपूर्ण स्वरूप? Tech News 
HIGHLIGHTS

WhatsApp ची नवीन आयकॉन सादर करून iOS वर रीडिझाइन केलेला इंटरफेस आणण्याची तयारी

iPhone साठी येत्या काळात कोणते नवीन फिचर आणू शकतो WhatsApp?

WhatsApp ला बऱ्याच काळापासून कोणतेही अपडेट मिळालेले नाहीत, ज्यामुळे ते इतर ऍप्सच्या तुलनेत जुने होत जात आहे.

मेटा मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp नवीन आयकॉन सादर करून iOS वर पुन्हा डिझाइन केलेला इंटरफेस आणण्याची तयारी करत आहे. एका अहवालानुसार, कंपनी ऍपच्या भविष्यातील अपडेटसह सेटिंग्ज विभागात नवीन आयकॉन सादर करणार आहे. प्रसिद्ध सुप्रसिद्ध WhatsApp टिपस्टर पब्लिकेशन WABetaInfo च्या अहवालानुसार, मेसेजिंग प्लॅटफॉर्म नवीन आयकॉन समाविष्ट करून iOS इंटरफेस सुधारण्यावर काम करत आहे. खालील पोस्टमध्ये तुम्ही ही माहिती बघू शकता.

येत्या काळात कोणते नवीन फिचर आणू शकतो WhatsApp?

whatsapp upcoming features for iphone users

WhatsApp भविष्यातील अपडेटमध्ये सेटिंग्ज विभागात नवीन आयकॉन समाविष्ट करण्याची अपेक्षा आहे. नवीन आयकॉन्सच्या परिचयामुळे, वापरकर्त्यांना अधिक चांगल्या आधुनिक इंटरफेसचा अनुभव घेता येईल, ज्यामुळे App अधिक आकर्षक दिसेल. त्याबरोबरच, WhatsApp भविष्यात चॅट इन्फो सेक्शनमध्ये रीडिझाइन केलेले आयकॉन समाविष्ट करण्याचा विचार करत आहे. साहजिकच, बदललेल्या नव्या इंटरफेससह, WhatsAppचे उद्दिष्ट एक चांगला आधुनिक आणि युजर फ्रेंडली अनुभव देण्याचा आहे.

“वापरकर्ते काही वर्षांपासून नव्या इंटरफेसची विनंती करत आहेत, कारण WhatsApp ला बऱ्याच काळापासून कोणतेही अपडेट मिळालेले नाहीत, ज्यामुळे ते इतर ऍप्सच्या तुलनेत जुने होत जात आहे.” नवीन डिझाइनसह, WhatsApp वापरकर्त्याच्या फीडबॅकला महत्त्व देण्यासाठी आणि ऍपचा इंटरफेस सुधारण्यासाठी आपली वचनबद्धता पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे एका अहवालानुसार पुढे आलेले आहे.

Video Avtar Calling फिचर

Whatsapp upcoming features for iphone users

अलीकडेच WhatsApp ने नवीन व्हिडिओ अवतार कॉलिंग वैशिष्ट्याची चाचणी सुरू केली आहे. या वैशिष्ट्यासह, वापरकर्ते व्हिडिओ कॉलिंग दरम्यान अवतार बदलण्यास सक्षम असतील. लक्षात घ्या की, मेटा ने जुलैमध्ये Instagram आणि Messenger वर रिअल-टाइम अवतार कॉलिंग फिचर सादर केले. त्याबरोबरच, WhatsApp ने Channel फिचर देखील सर्व वापरकर्त्यांसाठी रोलआऊट केले आहे. ज्याद्वारे युजर्स एखादी संस्था, व्यक्ती आणि सेलिब्रिटीजला फॉलो करून त्यांच्याबद्दल सर्व अपडेटेड माहिती मिळवू शकतात.

त्याचप्रमाणे, भविष्यातही WhatsAppवर अशा सुविधांचा समावेश होण्याची शक्यता आहे. WhatsApp ने एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसाठी ऑटोमॅटिक सिक्योरिटी कोड व्हेरिफिकेशन फिचरची चाचणी देखील सुरू केली आहे. यासह, व्हॉट्सऍपने या नवीन फिचरसाठी पुन्हा डिझाइन केलेली एन्क्रिप्शन व्हेरिफिकेशन स्क्रीन सादर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo